नरेंद्र मेहतांच्या कार्यालयाला घेराव, स्कूल व्हॅनची चावी काढल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 01:19 AM2018-01-25T01:19:28+5:302018-01-25T01:19:51+5:30
मीरा रोडच्या सेव्हन स्क्वेअर अॅकॅडमी शाळेच्या बसव्यतिरिक्त विद्यार्थी घेऊन येणा-या अन्य वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. शिवाय, व्हॅनची चावी काढून घेतल्याचा आरोप करत संतप्त पालकांनी आ. नरेंद्र मेहतांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीच्या कार्यालयास घेराव घातला. दरम्यान, विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी ही वाहने सरकारच्या निकषाप्रमाणे नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडे तक्रार केल्याचे मेहतांनी स्पष्ट केले.
मीरा रोड : मीरा रोडच्या सेव्हन स्क्वेअर अॅकॅडमी शाळेच्या बसव्यतिरिक्त विद्यार्थी घेऊन येणा-या अन्य वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. शिवाय, व्हॅनची चावी काढून घेतल्याचा आरोप करत संतप्त पालकांनी आ. नरेंद्र मेहतांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीच्या कार्यालयास घेराव घातला. दरम्यान, विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी ही वाहने सरकारच्या निकषाप्रमाणे नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडे तक्रार केल्याचे मेहतांनी स्पष्ट केले.
शाळेच्या बस असल्या तरी त्या सेवेचे शुल्क न परवडणाºया पालकांनी अन्य व्हॅनचा पर्याय निवडला. परंतु, शाळेच्या बसव्यतिरिक्त विद्यार्थी नेणाºया व्हॅनविरोधात मेहतांनी वाहतूक पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांच्याकडे तक्रार केली. आमदारांची तक्रार आल्याने पोलिसांनीही गेल्या आठवड्यात कारवाई केली.
दरम्यान, मेहतांनी एका व्हॅनची चावी काढली. त्यावरून पालक संतप्त झाले. त्यांनी शाळेजवळील सेव्हन इलेव्हनच्या कार्यालयास घेराव घातला. एका विद्यार्थ्याने सांगितले की, मेहता यांनी येऊन व्हॅनची चावी काढत विद्यार्थ्यांना गुराढोरांसारखे कोंबल्याचे सांगत व्हॅनचालिकेशी अरेरावी केली. व्हॅनची क्षमता १४ विद्यार्थ्यांची होती आणि १० विद्यार्थी त्यात होते, असे तो म्हणाला.
मेहतांच्या शाळेची बससेवा घ्या, असे सांगितले जाते. पण, परवडत नसल्याने आम्ही घेत नाही. पण, त्यांच्या दबावाखाली पोलीस आम्हाला धमकावत असल्याचा आरोप पालकांनी केला.
मेहतांकडून खंडन-
नरेंद्र मेहता यांनी मात्र आपण शाळेची बससेवा घेण्यासाठी कुणाही पालकांना सांगत नाही. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया शाळेच्या बससाठी सरकारचे निकष आहेत. त्याचे पालन केले जात नाही. विद्यार्थ्यांना जास्त संख्येने या वाहनांमध्ये कोंबले जाते. हे निदर्शनास आले असता
पोलिसांकडे तक्रार केल्याचे
सांगितले. चावी काढणे, महिलेस अरेरावीने बोलणे आदी प्रकार घडले नसल्याचे ते म्हणाले.