सरस्वती हत्याकांडचा क्रूरकर्मा साने विरोधात ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल
By धीरज परब | Published: September 7, 2023 11:13 PM2023-09-07T23:13:12+5:302023-09-07T23:13:23+5:30
सुमारे बाराशे पानांचे आरोपपत्र व ६२ साक्षीदार असल्याचे सूत्रांनी सांगितले .
मीरारोड - मीरारोड मध्ये घडलेल्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आणि सर्वाना हादरवणाऱ्या अश्या सरस्वती वैद्य (३२) हत्याकांडाचा क्रूरकर्मा आरोपी मनोज साने ( ५६ ) विरुद्ध नया नगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे . सुमारे बाराशे पानांचे आरोपपत्र व ६२ साक्षीदार असल्याचे सूत्रांनी सांगितले .
मूळचा बोरिवलीच्या बाभईचा असलेला मनोज साने हा सरस्वती सोबत मीरारोडच्या गीता नगर मधील गीता आकाशदीप इमारतीत भाड्याने २०१७ पासून रहात होता . विषारी कीटकनाशक देऊन ४ जून २०२३ रोजी सरस्वतीची हत्या केल्या नंतर त्याने मृतदेह सोबर नग्न फोटो काढले . मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी श्रद्धा वालकर हत्याकांड मधून तसेच इंटरनेट वरून शोधले. मृतदेहाचे कटर ने तुकडे करून कुकर मध्ये शिजवले व काही भाजले. थोडे तुकडे त्याने बाहेर फेकले . ६ जून च्या रात्री पोलिसांना शेजाऱ्या कडून समजल्यावर त्याला पकडले .
पोलिसांना घरातून सरस्वतीचे ३० ते ३५ तुकडे, कटर, कीटकनाशक बाटली , कुकर, टोप व दोघांचे मोबाईल आदी सापडले . मोबाईल मधून बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला . डिसेंम्बर २०२२ पासून दोघां मध्ये खटके उडत होते . १० वर्ष गोष्ट लपवून ठेवल्याचा जाब सरस्वती ने विचारला होता. मोबाईल मध्ये पॉर्न व्हिडीओ पाहणे , अन्य महिलांशी चॅटिंग करणे समोर आले . साने याला दुर्धर लैंगिक आजार आहे का ? व ती माहिती सरस्वती पासून लपवून ठेवल्या वरून वाद सुरु झाल्याची शक्यता त्यावेळी पोलिस सूत्रांनी सांगितली होती .
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सदर गुन्ह्याचा तपास केला होता . साने सध्या कारागृहात आहे . सोमवार ४ सप्टेंबर रोजी नया नगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात साने वर हत्ये सह विविध कलमां खाली गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल केले आहे . सुमारे १२०० पानांचे आरोपत्र असून त्यात साने व सरस्वती लिव्ह इन मध्ये रहात होते . साने याने आधी विष देऊन हत्या केली . तिचे तुकडे करण्यासाठी वापरलेली उपकरणे आदी अनेक पुरावे पोलिसांनी नमूद केले आहेत . तिच्या बहिणी , शेजारी , डॉक्टर पासून एकूण ६२ साक्षीदार पोलिसांनी नमूद केले आहेत . मानसिक दृष्ट्या साने हा फिट असल्याचा अहवाल असून शव विच्छेदनचा अंतिम अहवाल अजून प्रलंबित असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले .