जकातनाक्यावर चार्जिंग स्टेशन

By admin | Published: May 7, 2017 05:54 AM2017-05-07T05:54:11+5:302017-05-07T05:54:11+5:30

ठाणे परिवहन सेवेच्या विस्कटलेल्या गाड्यांमुळे ठाणेकरांना चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे यावर मात

Charging station on zakarnaka | जकातनाक्यावर चार्जिंग स्टेशन

जकातनाक्यावर चार्जिंग स्टेशन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या विस्कटलेल्या गाड्यांमुळे ठाणेकरांना चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे यावर मात करण्यासाठी महापालिका १०० इलेक्ट्रिक हायब्रीड बस घेणार आहे. पीपीपी तत्त्वावर त्या रस्त्यावर धावणार असल्या तरी पालिकेला कोणताही खर्च न करता, उलट महिनाकाठी १० लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. या बससाठी आवश्यक असणारे चर्जिंग स्टेशन आनंदनगर जकातनाक्यावर उभारण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानंतर, खऱ्या अर्थाने त्यांचा मार्ग मोकळा होणार आहे.
परिवहनच्या ताफ्यात सध्या ३१३ बस असून प्रत्यक्षात १८० च्या आसपास बस रस्त्यावर धावत आहेत. त्यात नव्याने घेण्यात येणाऱ्या १९० पैकी काही बस आता येत्या काही महिन्यांत दाखल होणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांना सध्या इतर सेवांवर अवलंबून राहावे लागते. ठाणेकरांची ही समस्या लक्षात घेऊन त्यांच्या सेवेसाठी या सेमीलोअरफ्लोअर इलेक्ट्रिक हायब्रीड बस पालिका पीपीपी तत्त्वावर घेणार असून यात एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. त्यानुसार, १०० बस घेण्याचा पालिकेचा मानस असून पहिल्या टप्प्यात १० बस घेतल्या जाणार आहेत. युरोपात ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक बस धावतात, त्यानुसार ठाण्यातही ही सेवा देण्याचा मानस एका कंपनीच्या मदतीने देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
पहिल्या टप्प्यात ज्या १० बस येणार आहेत, त्या आनंदनगर ते घोडबंदर गायमुख या मार्गावर धावणार असून प्रवाशांना साध्या दरातच एसी बसची सुविधा उपलब्ध होणार आहे. भविष्यात बोरिवलीपर्यंतदेखील ही सेवा देण्यात येणार आहे. या बसमध्ये मागील बाजूस संबंधित एजन्सी वायफाय स्टेशन अथवा लॅपटॉप आणि प्रिंटर अथवा इतर काहीही उपलब्ध करून देऊ शकते. त्याचे चार्जेस हे त्यांचे उत्पन्न असणार आहे.

एजन्सीचेच कर्मचारी

इलेक्ट्रिक बस खाजगी माध्यमातून घेतल्या जाणार असल्याने त्यावर चालक, वाहक, चार्जिंग आॅपरेटर हे संबंधित एजन्सीचे असणार आहेत. महापालिका केवळ त्यांच्यासाठी जागा देणार असून बसथांब्यावर चार्जिंग सेंटर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
आरटीआय नियमानुसार तिकिटाचे दर आकारण्यात येणार आहेत. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून संबंधित ठेकेदार हा एका बसमागे महिनाकाठी १० हजार रुपये प्रशासनास देणार असल्याने १०० बसपोटी १० लाखांचे उत्पन्न काही न करता मिळणार आहे.

Web Title: Charging station on zakarnaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.