ठाण्यातील हजारो खातेदारांची ६१ लाखांची फसवणूक करून पसार झालेल्या आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 09:31 PM2019-09-27T21:31:14+5:302019-09-27T21:37:32+5:30
ड्रीम्स ब्रोकिंग अॅण्ड ट्रेडिंग कंपनीतील हजारो खातेदारांची सुमारे ६१ लाखांची फसवणूक करून डोळस हा पसार झालेल्या मयूरेश डोळस (४२, रा. नौपाडा, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एका खासगी वित्तीय संस्थेतील हजारो खातेदारांची ६१ लाखांची आर्थिक फसवणूक करून गेल्या तीन वर्षांपासून पसार झालेल्या मयूरेश अरुण डोळस (४२, रा. नौपाडा, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रीम्स ब्रोकिंग अॅण्ड ट्रेडिंग कंपनीतील हजारो खातेदारांची सुमारे ६१ लाखांची फसवणूक करून डोळस हा पसार झाला होता. याप्रकरणी २०१६ मध्ये नौपाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवींच्या वित्तीय संस्थांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम ३ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल झालेला आहे. याच गुन्ह्यात तो गेल्या तीन वर्षांपासून पसार झालेला होता. तो नौपाडा भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने त्याला २६ सप्टेंबर रोजी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात दिले.