बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक, कोणार्क बँक वादात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 01:32 PM2018-02-09T13:32:56+5:302018-02-09T13:33:10+5:30

कोणार्क बँकेच्या सीईओ रमेश माखिजा व इतरावर २५ कोटी ६० लाखाची फसवणुक केल्याचा गुन्हा मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दाखल झाला.

Cheating by making fake documents, Konark bank dispute | बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक, कोणार्क बँक वादात

बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक, कोणार्क बँक वादात

Next

उल्हासनगर : कोणार्क बँकेच्या सीईओ रमेश माखिजा व इतरावर २५ कोटी ६० लाखाची फसवणुक केल्याचा गुन्हा मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दाखल झाला. मुळ कागदपत्राचे बनावट कागदपत्र, सहया व स्टँपचा वापर करून, वेगवेगळया १६ कंपण्या उघडल्या. त्यावर कर्ज घेवून परस्पर काढून फसवणुक केल्याची तक्रारीत निर्मल भाटिया यांनी म्हटले आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात कोणार्क बँक आहे. फियादी निर्मल भाटीया त्यांनी, त्यांचे मित्र सतिश हर्षलानी व महेश हर्षलानी यांना त्यांच्या ५ फर्म करीता ओव्हर डॉफट फॅसिलिटीची रक्कम ६ कोटीसाठी, कोणताही मोबदला न घेता मालमत्तेचे मुळे कागदपत्र कोणार्क बँके मार्फत भारत सहकारी बँक ठाणे येथे दिले होते. निर्मल भाटिया यांच्या मुळ कागदपत्राचा वापर कोणार्क बँकेचे सीईओ रमेश माखिजा यांच्यासह बँकेतील व बाहेरील सहकार्यांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुळ कागदपत्राचे बनावट कागदपत्र, स्टँप,व सहया करून त्यांच्या नावाने उघडलेल्या वेगवेगळया १६ कंपण्याच्या खात्यातून, वर्किंग कॅपिटल ओव्हर डफट सुविधेद्बारे, त्या कंपण्यावर कोटयावधीचे कर्ज मंजुर केले.

निर्मल भाटीया यांच्या नावाने उघडलेल्या वेगवेगळया १६ कंपण्याच्या खात्यात कर्जाचे जमा झालेली २५ कोटी ६० लाखाची रक्कम. बँकेचे सीईओ रमेश माखिजा व इतरांनी काढून घेवून, फसवणुक केली. असी तक्रार भाटिया यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दाखल केली. ५ मार्च २०१५ ते आजपर्यंत, हा प्रकार झाला. मध्यवर्ती पोलिसांनी निर्मल भाटिया यांच्या तक्रारीवरून कोणार्क बॅकेचे सीईओ रमेश माखिजा व इतर जणांवर २५ कोटी ६० लाखाची फसवणुक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. अधिम चौकशी व तपास मध्यवर्ती पोलिस करीत आहेत.

चुकीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
फियादी निर्मल भाटिया यांनी केलेली तक्रार खोटी असून पोलिसांनी चौकशीनंतर गुन्हा दाखल करायला हवा होता. याप्रकाराने बॅकेची बदनामी होत असल्याची प्रतिक्रीया बॅकेचे नवे सीईओ ग्वालानी यांनी दिली. याबाबत वरिष्ठ स्तरावर दाद मागणार असल्याचे ग्वालानी म्हणाले.

Web Title: Cheating by making fake documents, Konark bank dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.