प्रशिक्षणाच्या नावाखाली फसवणूक
By admin | Published: January 9, 2017 07:31 AM2017-01-09T07:31:15+5:302017-01-09T07:31:15+5:30
अनेक सुशिक्षित मुली स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण घेत असतात. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गृहिणीही अशा प्रशिक्षणाकडे
बदलापूर : अनेक सुशिक्षित मुली स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण घेत असतात. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गृहिणीही अशा प्रशिक्षणाकडे वळत असतात. हे प्रशिक्षण घेताना सरकार मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्राला पसंती दिली जाते. याचाच फायदा घेऊन बदलापुरात एका दाम्पत्याने १०० ते १५० महिला आणि तरु णींना व्यवसाय प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा घातल्याचे उघडकीस आले.
सानेवाडी परिसरात मार्चमध्ये सुनील घडवले व त्याची पत्नी सुप्रिया यांनी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. या केंद्राची जाहिरातबाजी केली होती. त्यामध्ये इंग्लिश स्पीकिंग, मोबाइल रिपेअरिंग, फॅशन डिझायनिंग, टेलरिंग, कॉम्प्युटर ट्रेनिंग, ज्वेलरी मेकिंग, ब्युटी पार्लर अशा विविध प्रकारच्या प्रशिक्षणांचा समावेश होता. हे फक्त महिलांसाठीच प्रशिक्षण असून केंद्र सरकार मान्यता प्राप्त असल्याचा दावा केला होता. मोफत शिका आणि पाच हजार प्रशिक्षण शुल्क मिळवा, अशी जाहिरात केली होती. त्याशिवाय, येथे प्रशिक्षण घेतलेल्या काही महिलांना येथेच नोकरीही दिली. त्यामुळे अनेक महिलांनी येथे प्रवेश घेतला. त्यांच्याकडून वेगळ्या प्रशिक्षणासाठी १ पासून ते ३२ हजारांपर्यंत रक्कम फी म्हणून घेतली. परंतु, २५ आॅक्टोबरला अचानक हे दाम्पत्य प्रशिक्षणासाठी जमा झालेले फीचे लाखो रु पये घेऊन पसार झाले. (प्रतिनिधी)