रस्त्यांच्या कामांची आयआयटीकडून झाडाझडती सुरु

By अजित मांडके | Published: March 27, 2023 02:33 PM2023-03-27T14:33:26+5:302023-03-27T14:34:48+5:30

ठेकेदारांचे दाबे दणाणले

checking starts from iit for road works in thane | रस्त्यांच्या कामांची आयआयटीकडून झाडाझडती सुरु

रस्त्यांच्या कामांची आयआयटीकडून झाडाझडती सुरु

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : रस्त्यांच्या कामाबाबत हयगय खपवून घेणार नसल्याचे ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले होते. तसेच ठेकेदारावर देखील कारवाई केली जाईल असेही त्यांनी सुचित केले होते. त्यातही रस्त्यांच्या कामांचे थर्ड पार्टी आॅडीट केले जाईल असे जाहीर केले होते. त्यानुसार आता आयआयटी मार्फत शहरातील रस्त्यांची झाडाझडती सुरु करण्यात आली असल्याची महापालिका सुत्रांनी दिली आहे.

ज्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत, ज्या रस्त्यांची कामे सुरु आहेत, अशा रस्त्यांची झाडाझडती घेतली जात असल्याने ठेकेदारांची दाबे मात्र दणाणले आहेत. ठाणे महापालिका हद्दीत शहर सुशोभिकरण आणि खड्डे मुक्त रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार दोन टप्यात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पहिल्या टप्यातील रस्त्यांची कामे अंतिम टप्यात आल्याचे दिसत आहे. तर दुसºया टप्याच्या कामांना देखील वेग आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात २१४ कोटी तर दुसऱ्या टप्प्यात ३९१ कोटी असे एकूण ६०५ कोटी निधी रस्त्यांसाठी मिळणार आहे.

त्यातून शहरातील  २८३ रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या व नव्याने करण्यात येणाºया रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून या सर्व रस्त्यांची कामे उत्कृष्ट दर्जाची व गुणवत्तापूर्वक व्हावी, यासाठी पालिका आयुक्त अभिजित बांगर हे प्रयत्नशील आहेत. ही सर्व रस्त्याची कामे ३१ मे पूर्वी म्हणजेच पावसाळ्यापूर्वी करण्याचे नियोजन आहे. परंतु रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत, त्यात कोणत्याही प्रकारची कुचराई करु नये असे आयुक्तांनी यापूर्वीच बजावले आहेत. त्यातही रस्त्यांची कामे गुणवत्ता पूर्वक आहेत, किंवा नाही यासाठी थर्ड पार्टी आॅडीट केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले होते. 

त्यानुसार मागील काही दिवसापासून शहरातील विविध भागात सुरु असलेल्या रस्त्यांची झाडाझडती आयआयटी कडून केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. आयआयटीचे एक पथक ठाण्यात धडकले असून ठाणे महापालिकेच्या अभियंत्या समवेत आयआयटीचे के.व्ही.कृष्णराव आपल्या पथकासमवेत ठाण्यात दाखल झाले आहेत.  त्यांच्याकडून रस्त्याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली जात आहे. ज्या ठिकाणी डांबर बनविले जाते त्या युनिटला भेट देवून त्याची गुणवत्ता तपासली गेली. रस्ता उभारणीच्या साहित्याचा तपशील आयआरसीच्या निकषाप्रमाणे आहे की नाही, त्याचबरोबर बांधलेल्या रस्त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट केल्या जात आहेत. त्यानुसार रस्त्यांची तपासणी सुरु झाली आहे. त्यामुळे ठेकेदारांची दाबे मात्र चांगलेच दणाणले आहेत.

रस्त्याच्या कामांचा दर्जा सर्वोत्तम रहावा यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. रस्त्याच्या ठेकेदारांवर दोष दायित्व म्हणुन या कालावधीमध्ये रस्त्यावर खड्डे पडल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक दंड आकारण्याची घोषणा पालिका आयुक्तांनी केली आहे. उभारण्यात आलेल्या रस्त्यावर खड्डा आढळल्यास प्रत्येक खड्ड्यामागे एक लाख रुपयाचा दंड ठेकेदारांना भरावा लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: checking starts from iit for road works in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.