पानेरी नदीत रासायनिक पाणी; चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:20 PM2019-01-30T23:20:21+5:302019-01-30T23:20:43+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश तहसीलदार कचेरीतच अडकले

Chemical water in the Paneri River; Inquiry demand | पानेरी नदीत रासायनिक पाणी; चौकशीची मागणी

पानेरी नदीत रासायनिक पाणी; चौकशीची मागणी

Next

- हितेन नाईक

पालघर : बेकायदेशीर रित्या कंपनी उभारून त्यातील रासायनिक कारखान्यामधील प्रदूषित रासायनिक पाणी पानेरी नदीत सोडणाºया कंपन्या विरोधात जिल्हाधिकाºयां कडे केलेल्या तक्रारीला वर्षभराचा कालावधी उलटून गेला आहे. त्या कंपन्या विरोधात चौकशी करून कारवाईचे आदेश वर्षभरापासून तहसीलदार कार्यालयाच्या दप्तरात दाबले जात आहेत.

जिल्हाधिकरी कार्यालयाला लागूनच असलेल्या दिवाण अँड सन्स उद्योग नगर, अल्याळी औद्योगिक क्षेत्रातील ड्युरीअन कंपनीच्या मालकांनी मोकळ्या जागेत पालघर प्लायवूड प्रॉडक्ट्स प्रा. ली. कंपनीला मशिनरी लावून उत्पादन सुरू करण्याची परवानगी दिली होती. प्लायवूड कंपनीने आपल्या मशिनरी लावीत उत्पादन सुरू करीत त्या उत्पादनातुन निघणारे प्रदूषित पाणी एका पाईपद्वारे चोरट्या पद्धतीने पानेरी नदीला जोडणाºया एका नाल्यात सोडले होते. माहीम ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी प्रदूषण मंडळाच्या अधिकाºया सोबत ड्युरिअन कंपनीत धाड टाकून भांडा फोड केला होता.

तारापूर प्रदूषण मंडळाचे अधिकाºयांनी या प्रकाराचा १३ डिसेंबर २०१७ रोजी पंचनामा करून पालघर प्लायवूड कंपनीवर १८ डिसेंबर २०१७ रोजी ३३ अन्वये क्लोजर नोटीसची कारवाई केली होती. परंतु पालघर प्लायवूड कंपनीने ड्युरीअन कंपनीला आपल्या कंपनीच्या मोकळ्या जागेत कुठल्याही विभागाच्या परवानग्या न घेता कंपनी उभारणे, बेकायदेशीररीत्या विद्युत पुरवठा करणे, शासनाच्या सेल टॅक्स, इन्कमटॅक्स, ग्रामपंचायतीचा कर आदी महसूल बुडवणे अशी बेकायदेशीर कृत्य केल्याने दोन्ही कंपन्यांच्या मालकावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची तक्र ार जिल्हाधिकाºया कडे ४ एप्रिल २०१८ मध्ये करण्यात आली होती.

जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी २४ जुलै रोजी २०१८ रोजी उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांच्या कडे कार्यवाही करून तक्र ारदारांना काळविण्याचे आदेश दिले होते तर उपविभागीय अधिकारी गजरे यांनी तहसीलदार महेश सागर यांच्या कडे हे प्रकरण पाठवले होते. या संदर्भात तहसीलदार कार्यालयाने काय कार्यवाही केली या बाबत तक्र ारदाराला आजही कळविलेले नाही.

माहीम-वडराई गावकऱ्यांची जागृती
पानेरी वाचवा ची हाक देत हजारो माहिम-वडराईकर जनजागृती साठी दिवसरात्र फिरून आपल्या नदीला वाचवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अशावेळी कुठल्याही विभागाची परवानगी न घेता बेकायदेशीर रित्या प्लांट उभारून त्या द्वारे घेतल्या जाणाºया उत्पादनातून निघणारे प्रदूषित पाणी पाईपलाईन द्वारे पानेरी नदीत चोरट्या पद्धतीने सोडणाºया दोन्ही कंपन्यांचे पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयाला देऊनही दोन्ही कंपन्यावर कारवाईचा बडगा का उभारला जात नाही या बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रशासनाला या जाब विचारला जात आहे.

प्रदूषण मंडळाने त्या कंपनीवर क्लोजर नोटीस बजावली होती. त्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत पुरावे दिल्यास कारवाई करू!
- डॉ.प्रशांत नारनवरे,
जिल्हाधिकारी पालघर.

दोन्ही कंपनीनी बेकायदेशीर कृत्य केली असून प्रदूषण करणारी पालघर प्लायवूड आणि त्यांना साथ देणारी ड्युरीअन कंपन्यांच्या एनओसी माहीम ग्रामपंचायतींनी रद्द कराव्यात.
-निलेश म्हात्रे,
पानेरी बचाव समिती

Web Title: Chemical water in the Paneri River; Inquiry demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.