छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात किन्नरांसाठी १५ बेड राखीव; वेगळी ओपीडीदेखील सुरु करणार

By अजित मांडके | Published: April 3, 2024 05:20 PM2024-04-03T17:20:14+5:302024-04-03T17:21:10+5:30

येत्या काळात या रुग्णालयाची क्षमता वाढविली जाणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे

Chhatrapati Shivaji Maharaj Hospital reserves 15 beds for Kinyars; A separate OPD will also be started | छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात किन्नरांसाठी १५ बेड राखीव; वेगळी ओपीडीदेखील सुरु करणार

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात किन्नरांसाठी १५ बेड राखीव; वेगळी ओपीडीदेखील सुरु करणार

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आता किन्नरांसाठी देखील एक विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी १५ बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यांच्यासाठी वेगळी ओपीडीदेखील सुरु करण्यात आली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे आता महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात किन्नरांना देखील उपचारासाठी हक्काचे बेड उपलब्ध झाले आहेत. ठाणे महापालिकेचे एकमेव छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे कळवा भागात आहे.

याठिकाणी ठाण्यासह मुंब्रा, दिवा, दिघा, नवीमुंबई आदींसह जिल्ह्याच्या विविध भागात रुग्ण उपचारासाठी येत असतात.  याठिकाणी ५०० ची बेड क्षमता आहे. परंतु मधल्या काळात या रुग्णालायवरील ताण अधिकच वाढल्याचे दिसून आले होते. ओपीडीवर तब्बल २ हजार ते २७०० च्या आसपास रुग्ण रोजच्या रोज ओपडीवर येत आहेत.  तर सध्या रोजच्या रोज १०० ते १२५ रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

येत्या काळात या रुग्णालयाची क्षमता वाढविली जाणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून ६० कोटींचा निधी देखील महापालिकेला प्राप्त झाला असून आता आणखी ५०० बेड याठिकाणी वाढविण्यात येणार आहेत.

दरम्यान, असे असताना आता रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्याबाबत आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार रुग्णालयात आता किन्नरांसाठी विशेष १५ बेड राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्याचा फायदा आता येथे उपाचारासाठी येणाºया किन्नरांना होत असल्याचेही समाधानकारक चित्र दिसत आहे. याशिवाय याच ठिकाणी एक कर्मचारी त्यांच्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याच्या माध्यमातून किन्नरांना ओपीडीवर देखील सेवा पुरविली जात आहे. यापुढेही जाऊन त्यांच्यासाठी विशेष डॉक्टराची नियुक्ती आणि मनोसोपचार तज्ञ देखील उपलब्ध करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. एकूणच आता किन्नरांना रुग्णालयात आल्यानंतर खेळीमेळीचे वातावरण पहावयास मिळणार आहे.

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj Hospital reserves 15 beds for Kinyars; A separate OPD will also be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.