मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली मुरबाडच्या वाल्हीवले अन् कळबांडच्या गुळवेल काढ्याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:50 AM2021-06-09T04:50:18+5:302021-06-09T04:50:18+5:30

ठाणे : आपापल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये आणि कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोविड नियमावलीचे पालन करतानाच ग्रामस्थांना आर्सेनिक अल्बमच्या ...

The Chief Minister came to know about the removal of Valhivale and Kalband of Gulbad from Murbad | मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली मुरबाडच्या वाल्हीवले अन् कळबांडच्या गुळवेल काढ्याची माहिती

मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली मुरबाडच्या वाल्हीवले अन् कळबांडच्या गुळवेल काढ्याची माहिती

Next

ठाणे : आपापल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये आणि कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोविड नियमावलीचे पालन करतानाच ग्रामस्थांना आर्सेनिक अल्बमच्या गाेळ्यांसह गुळवेल काढा पाजून कोरोनामुक्ती मिळविल्याची माहिती ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील वाल्हीव्हरेगावचे सरपंच रघुनाथ खाकर आणि कळबांड गावच्या आशा स्वयंसेविका रोहिणी भोंडीवले यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी राज्यातील सरपंच आणि आशासेविकांशी ऑनलाइन संवाद साधून त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यावेळी खाकर आणि भाेंडीवले यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून ठाकरे यांच्याशी संवाद साधून गुळवेल काढ्याची माहिती त्यांना दिली.

या दोघांनी मनोगत व्यक्त करताना आपापल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये आणि कोरोनावर नियंत्रण मिळवताना कशाप्रकारे उपाययोजना केल्या, त्यासाठी कोणकोणत्या समस्यांना तोंड देऊन गाव कोरोनामुक्त केले आदी माहिती कथन केली.

आमच्या गावात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नसून गाव पूर्णतः कोरोनामुक्त असल्याचे सरपंच खाकर यांनी सांगितले. गावात संसर्ग होऊ नये यासाठी मार्च २०२०लाच गाव लॉकडाऊन केले. गाव दक्षता समिती स्थापन करून नागरिकांना कोरोनाची आणि लक्षणाची माहिती दिली. गावाला वारंवार हात धुण्याची सवय लावली. गाव माळशेजच्या पायथ्याशी असल्याने पर्यटकांची गर्दी होऊ नये, यासाठी भर दिला. गावातील प्रत्येक नागरिकाचे सर्वेक्षण केले. तसेच गावातल्याच जंगलात मिळणारी ‘गुळवेल’चे प्रत्येक घरात वाटप करून लोकांना ‘गुळवेल’चा काढा प्यायला लावला. त्याचबरोबर जास्तीत नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले. तिसऱ्या लाटेचीदेखील गावाने तयारी केली असून, गावकरी उत्तम सहकार्य करत आहेत. त्यामुळे गाव अखेरपर्यंत कोरोनामुक्त राहील, असा ठाम निर्धार व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्र्यांशी बोलताना आशा स्वयंसेविका भोंडीवले यांनी कोरोनाच्या काळात माझे कुटुंब, माझी जबाबदारी, अभियानाच्या वेळी सर्वेक्षण करून कोरोना रुग्णांसह क्षयरोग, मधुमेय, कर्करोग, सारी, उच्चरक्तदाब या आजारांच्या व्यक्तींनादेखील संदर्भसेवा दिल्याचे सांगितले. या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे आदी उपस्थित होते.

------

Web Title: The Chief Minister came to know about the removal of Valhivale and Kalband of Gulbad from Murbad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.