टेंभी नाका दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री शिंदे, अभिनेत्री रकुल प्रीतची उपस्थिती

By अजित मांडके | Published: September 7, 2023 03:58 PM2023-09-07T15:58:46+5:302023-09-07T15:58:55+5:30

अभिनेता जॅकी भगनानी देखील दहीहंडीला हजर

Chief Minister Eknath Shinde Bollywood actress Rakul Preet attended Tembhi Naka Dahihandi festival | टेंभी नाका दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री शिंदे, अभिनेत्री रकुल प्रीतची उपस्थिती

टेंभी नाका दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री शिंदे, अभिनेत्री रकुल प्रीतची उपस्थिती

googlenewsNext

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेभी नाका दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली आहे. याचसोबत अभिनेता जॅकी बगनानी आणि अभिनेत्री राकुल प्रीत कौर यांचीही हजेरी लावली आहे. गोविंदा पथकांना उत्सवाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर्षी आणखी जोरदारपणे उत्सव साजरे करण्याची घोषणा केली आहे.

आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले, हंडीला वरून राजाही  प्रसन्न झाला आहे . मुंबईत तसेच  ठाण्यात गोविंदाचा उत्साह शिगेला पोचला असून , खरं म्हणजे ठाणे हे गोविंदाचे पांढरी असल्याचे त्यांनी सांगितले. धर्मवीर आनंद  दिघें यांनी हा उत्सव  सुरु केला आणि संपूर्ण महाराष्ट्रात उत्सव साजरा करू लागले, आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मी  मुख्यमंत्री झालो, त्यामुळे आपण राज्यात चांगले काम करत आहोत , कोरोना काळात लावण्यात आलेली सर्व नियम, बंधने काढून टाकली , गणपती उत्सवावरील वरील सर्व बंधने काढून टाकली , यावर्षी आणखी जोरदार उत्सव साजरे करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली  , थर लावताना प्रत्येकाचा  जीव महत्वाचा आहे , सरकारने यावेळी प्रो गोविंदा घेऊन साहसी खेळात याचा समावेश आहे , गोविंदाची सुट्टी पण जाहीर केली , १० लाखांचा विमा देखील काढला ,त्यामुळे  सांघिक भावनेने उत्सव साजरा करून या उत्सवाला  गालबोट लागला काम नये  असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

अभिनेत्री रकुल प्रीत कौर यांनी हा माझा पहिला दहीहंडी  उत्सव आहे . मला आनंद आहे ठाण्यात येऊन हा  उत्सव साजरा करायला मिळाला असल्याचे सांगत  सुरक्षेचे नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर अभिनेता जॅकी बगनानी यांनी मी  अनेक हंडी बघितल्या पण हा उत्सव उत्सवातील उत्साह  कधीच पहिला नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी हा उत्सव ४० ट्रेनमध्ये टीव्हीवर दिसत असून  महाराष्ट्रात विकासाचे थर मुख्यमंत्र्यांनी लावले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी  मुख्यमंत्र्यांचा टेभी नाका  मित्रमंडळाच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला.

Web Title: Chief Minister Eknath Shinde Bollywood actress Rakul Preet attended Tembhi Naka Dahihandi festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.