मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद मठात साजरा केला वर्षपूर्तीचा जल्लोष...
By अजित मांडके | Published: June 30, 2023 07:18 PM2023-06-30T19:18:52+5:302023-06-30T19:19:06+5:30
30 किलोचा केक कापून व्यक्त केला आंनद.
ठाके: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रमात शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त आनंद दिघे यांना अभिवादन केले. प्रथम त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले आणि नंतर आनंद दिघेंच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी आनंद आश्रमात शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
शिंदे सरकारच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांसोबत ठाण्याच्या आनंदाश्रमाबाहेर केक कापून आनंद साजरा केला. व्हिडिओ : विशाल हळदे#EknathShindepic.twitter.com/w06UnHtPBR
— Lokmat (@lokmat) June 30, 2023
नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचत हे सरकार अत्यंत मजबूत असून अधिक सक्षमपणे काम करत असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी विरोधकांनाही जोरदार टोले लगावला. यानंतर आनंद आश्रमाबाहेर लावण्यात आलेल्या स्टेजवर 30 किलोचा केक कापण्यात आला.
दरम्यान टेंभी नाक्यावर जल्लोष सुरू असतानाच देवेंद्र फडणवीसांनी व्हिडीओ कॉल करत त्यात सहभाग नोंदवला आणि आनंदात सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनीसुदधा त्यांना व्हिडीओ कॉल करून शुभेच्छा दिल्या. यावेळी आश्रमात शिवसेना भाजप युतीचा विजय असो आशा घोषणाबाजी करण्यात आली.