गुणवत्ता अटीच्या शिथीलतेसाठी कामगारांचे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे
By सुरेश लोखंडे | Published: February 25, 2024 10:10 PM2024-02-25T22:10:56+5:302024-02-25T22:11:21+5:30
सध्या या महापालिकेने गेल्या वर्षी कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या एक हजार १७८ जागा भरण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेतल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुंबई महानगरपालिकचे सफाई आणि इतर तत्सम कामे करणारे चतुर्थश्रेणी कामगार पदवी, पदव्युत्तर पदवी, एल.एल.बी., एल.एल.एम., अभियांत्रिकी, एम.बी.ए. पर्यंतेच शिक्षण घेऊनही सफाई, लिपीक पदाचे काम करणार्या कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी उच्चश्रेणीच्या रिक्त जागांसाठी परीक्षा दिली. पण गुणवत्तेत कमी पडल्यामुळे त्यांची संधी गेली. ती प्राप्त करण्यासाठी गुणवत्ता व वयाची अट शिथील करण्याची या शेकडो कर्मचाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे निवासस्थान गाठून या जाचक अटी शिथील करण्यासाठी साकडे घातले आहे.
सध्या या महापालिकेने गेल्या वर्षी कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या एक हजार १७८ जागा भरण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेतल्या. हया परिक्षेसाठी दोन हजार कामगार बसले होते. या परीक्षेतील दोन जाचक अटींमुळे प्रशासनाला पुरेसे उमेदवार मिळाले नाही. परीक्षेच्या निकालानंतर एक अट शिथिल केलेल्यामुळे प्रत्यक्षात किमान ९९ गुण मिळालेल्या ८२९ उमेदवारांना नियुक्ती मिळत आहे ज्यामध्ये अनुर्तीण उमेदवारांचाही समावेश आहे, अशा अनुर्तीण उमेदवारांना उत्तीर्ण म्हणून मान्यता देऊन नियुक्ती देण्यास मंजुरी दिली आहे. या किमान ९० गुणांच्या अटीमुळे ९० पेक्षा कमी गुण मिळालेले उमेदवार नियुक्ती पासून वंचित राहीले आहेत. या गुणवत्तेची अट शिथील करुन या पदी नियुक्ती देण्याची मागणी या कामगारांनी लावून धरली.
सर या एकूण ९९ गुणांच्या दुस-या अटीमुळे मागासप्रवर्गाच्या ३४९ रिक्त जागा असूनही प्रशासन उर्वरित उमेदवारांचा विचार करीत नाही. त्यामुळे ९० गुणांची अट शिथिल करून मागासप्रवर्गाच्या ३४९ रिक्त जागा भरण्यात याव्यात आणि उर्वरित उमदेवारांची कागदपत्रे पडताळणी करून पडताळणी सापेक्ष पात्र कामगारांना लिपिक पदावर सामावून घेण्यात यावी, या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला आहे.