रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून 

By अजित मांडके | Published: May 20, 2024 03:47 PM2024-05-20T15:47:15+5:302024-05-20T15:47:46+5:30

ताफ्यातील पोलिसांची गाडी सोबत देऊन महिलेला पोहचवले रुग्णालयात, मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलपणाचे पुन्हा एकदा आला प्रत्यय 

Chief Minister Eknath Shinde help the woman who was injured after the rickshaw overturned | रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून 

रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून 

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पहायला मिळाला. कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या एका महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री स्वतः  धावून गेले. 

आज 20 मे निमित्त शहरात सगळीकडे उत्साहात मतदान पार पडत आहे. सकाळी स्वतः कुटूंबासोबत मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते. सकाळी ठाणे आणि त्यानंतर मीरा भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचा ताफा कळव्याकडे निघाला. कळवा पुलावरून जात असताना अचानक त्याना एक रिक्षा रस्त्यावर उलटल्याचे दिसले. या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ त्यांनी आपला ताफा थांबवून ते या महिलेच्या मदतीला धावून गेले.

या महिलेने त्याना आपल्या डोक्याला मार बसल्याने गरगरत असल्याचे सांगितले. शिंदे यांनी तत्काळ त्याना आपल्या गाडीतून पाणी आणून दिले. तसेच पुढील उपचारासाठी आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन देऊ करून या महिलेला कळवा रुग्णालयात दाखल करायला सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उतरून आपल्याला मदत केल्याबद्दल या महिलेने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.  तर मतदानाच्या दिवशीही जनतेची काळजी घेणाऱ्या संवेदनशील मनाचा मुख्यमंत्री यानिमित्ताने पुन्हा एकदा ठाणेकरांना अनुभवायला मिळाला.

Web Title: Chief Minister Eknath Shinde help the woman who was injured after the rickshaw overturned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.