मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेवून महायुती पक्षांतील तणाव, संघर्ष थांबवावा- आनंद परांजपे

By अजित मांडके | Published: February 5, 2024 03:47 PM2024-02-05T15:47:30+5:302024-02-05T15:53:51+5:30

"भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेली गोळीबाराची घटना निंदनीय आहे."

Chief Minister Eknath Shinde should take the initiative and stop the tension and conflict between the Grand Alliance parties - Anand Paranjape | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेवून महायुती पक्षांतील तणाव, संघर्ष थांबवावा- आनंद परांजपे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेवून महायुती पक्षांतील तणाव, संघर्ष थांबवावा- आनंद परांजपे

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेली गोळीबाराची घटना निंदनीय आहे. पण या घटनेवरून बोध घेऊन, ठाणे जिल्ह्यातील शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील पक्षातील असलेला अंतर्गत तणाव, संघर्ष, धुसफुस दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, असे मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेली गोळीबाराची घटना निंदनीय आहे. पण ठाणे जिल्ह्यात खासकरुन शिवसेना व भाजप यांच्यात अंतर्गत धुसफुस असल्याचे या घटनेने उघड केले आहे. ठाण्यातही भाजप आमदार संजय केळकर व शिवसेना नेते यांच्यात सतत अंतर्गत तणावाचे दर्शन घडत असते तर हाच प्रकार मिरा-भाईंदर, नवीमुंबई, कल्याण, उल्हासनगर आदी ठिकाणी, ठाणे जिल्ह्यातील भाजप व शिवसेनेत अंतर्गत संघर्ष वारंवार दिसून आलेला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच निघणार आहे, देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील तीनही जागा जिंकणे महत्वाचे आहे. अशावळी, मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील घटक पक्षातील मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन महायुतीतील पक्षांतील तणाव, संघर्ष, धुसफुस दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मत परांजपे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Chief Minister Eknath Shinde should take the initiative and stop the tension and conflict between the Grand Alliance parties - Anand Paranjape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.