ठाण्यात नववर्ष स्वागतयात्रेत मुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती
By प्रज्ञा म्हात्रे | Published: March 22, 2023 05:11 PM2023-03-22T17:11:52+5:302023-03-22T17:13:08+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांची ही पहिली स्वागतयात्रा होती.
ठाणे : रांगोळ्यांच्या पायघड्या, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या सायकलप्रेमींची सायकल रॅली, ७५ चित्ररथांचा सहभाग, महिलांची बाईक रॅली, विविध सामाजिक संस्थांचे सादरीकरण, आरोग्याबरोबरच पर्यावरणाचा दिलेला संदेश, ढोल ताशांचा गजर, विद्यार्थ्यांचा सहभाग अशा उत्साहपूर्ण वातावरणात गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आलेली नववर्ष स्वागतयात्रा रंगली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांची ही पहिली स्वागतयात्रा होती.
तीन पेट्रोल पंप येथे क्रीडा भारतीचे एरियल सिल्कचे, सरस्वती क्रीडा संकुलचे जिमनॅस्टिकचे प्रात्यक्षिक, डॉ. पल्लवी नाईक यांच्या शिष्यांचे शिवतांडववर आधारित भरतनाट्यम, समतोल फाउंडेशनच्या मुलांचे बँड वादन, वीर गर्जना ढोल ताशा प्थक, डॉ. बेडेकर विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांचे लेझिम पथक आदी सादरीकरण पाहायला मिळाले.
चित्ररथांचा निकाल -
प्रथम - क्रीडा भरती
द्वितीय : विद्याभारती
तृतीय : तेली समाज ( मिलेट्स )
मोरया ग्रुप
सरस्वती क्रीडा संकुल ( जिमनॅस्टिक)
परिणामकारक सादरीकरण
प्रथम -भगिनी निवेदिता उष्कर्ष मंडळ
द्वितीय - स्पॅरो फाउंडेशन
तृतीय - हरे राम हरे कृष्ण
ठामपा आरोग्य विभाग
संस्कृत भारती
विशेष पारितोषिक -
ठाणे चॅरिटी कमिशनर, बार असोसिएशन, ठाणे जिल्हा वकील संघ