वडपे-भिवंडी रस्त्याच्या आठ पदरीकरणासाठी मुख्यमंत्री, केंद्रीय परिवहन मंत्री २४ जानेवारीस भिवंडी दिवे अंजूर येथे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 05:27 PM2019-01-22T17:27:03+5:302019-01-22T17:31:37+5:30
पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार यांची उपस्थिती राहील. पुरुषोत्तम पाटील क्रीडा नगरी, दिवे अंजूर येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे कळविण्यात येते.
ठाणे दि २२: राष्ट्रीय महामार्ग ८४८ वरील वडपे ते भिवंडी या सुमारे २१ किमी अंतराचे आठ पदरीकरण त्याचप्रमाणे शहापूर ते खोपोली या ९१ किमी रस्त्याचे चार पदरीकरण करण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २४ जानेवारीस याचे भूमिपूजन होत आहे. केंद्रीय परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी असतील.
पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार यांची उपस्थिती राहील. पुरुषोत्तम पाटील क्रीडा नगरी, दिवे अंजूर येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे कळविण्यात येते.
वडपे ते भिवंडी या आठ पदरीकरणासाठी सुमारे ११८ कोटी तर शहापूर ते खोपोली रस्त्यासाठी ४४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.