मुख्यमंत्री १८ मे रोजी पालघर दौऱ्यावर
By admin | Published: May 16, 2017 12:48 AM2017-05-16T00:48:23+5:302017-05-16T00:48:23+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १८ मे रोजी पालघर जिल्ह्यातील विकास कामे, समस्या यांचा आढावा घेण्यासाठी येत असून बहुधा तलासरी किंवा विक्रमगड येथे हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १८ मे रोजी पालघर जिल्ह्यातील विकास कामे, समस्या यांचा आढावा घेण्यासाठी येत असून बहुधा तलासरी किंवा विक्रमगड येथे हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
मोखाडा तालुक्यातील मध्य वैतरणा प्रकल्पाचे नामकरण करण्याच्या मुंबई महानगर पालिकेचा कार्यक्रम वगळता पालघर जिल्हा निर्मितीनंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच पालघरमध्ये येत आहेत. जलयुक्त शिवार, कृषी पंपाना वीज जोडणी, मागेल त्याला शेततळी, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, पीक कर्ज, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, अमृत आहार योजनेसह जिल्हा मुख्यालयातील कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. विकासाच्या नावाखाली पालघर जिल्ह्यात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, मुंबई-वडोदरा बुलेट ट्रेन, वाढवणं बंदर, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस ई. प्रकल्प येत असून ह्या विरोधातील लढणाऱ्या संघटनांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची मागणी केली आहे.