मुख्यमंत्री २० तारखेला २७ गावांत

By admin | Published: October 19, 2015 01:13 AM2015-10-19T01:13:32+5:302015-10-19T01:13:32+5:30

कोणत्याही परिस्थितीत कल्याण-डोंबिवली मनपात भाजपाचा महापौर निवडून आणण्याचा ध्यास घेलेल्या भाजपाने २७ गावांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

Chief Minister will be present in 27 villages | मुख्यमंत्री २० तारखेला २७ गावांत

मुख्यमंत्री २० तारखेला २७ गावांत

Next

चिकणघर : कोणत्याही परिस्थितीत कल्याण-डोंबिवली मनपात भाजपाचा महापौर निवडून आणण्याचा ध्यास घेलेल्या भाजपाने २७ गावांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.
त्यामुळे मंगळवारी २० आॅक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २७ गावांत येत असून येथूनच ते भाजपाच्या जाहीर प्रचारांचा नारळ फोडणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता मानपाडास्थित प्रिमीअर मैदानात मुख्यमंत्र्यांची सभा असल्याची माहिती भाजपा ग्रामीणचे उपाध्यक्ष गणेश म्हात्रे यांनी दिली.
विनोद काळण, रुपाली गोरे, सुनिता खंडागळे, शीतल चव्हाण, मोरेश्वर भोईर, राहुल पाटील, रमाकांत पाटील, नीता म्हात्रे, सुनिता पाटील, स्नेहल म्हात्रे, रेश्मा धमापूरकर, दमयंती वझे, जालंधर पाटील, इंदिरा तरे, लालचंद भोईर, पूजा पाटील, प्रशिला साळुंखे अशा १७ सर्वपक्षिय उमेदवारांना समितीने पुरस्कृत केले आहे. शिवसेने समोर समितीने आव्हान उभे केले असले तरी शिवसेनाही आपल्या रणनीतीनुसार गुप्त प्रचार करीत आहे. कोणाची किती ताकद आहे हे निकालावरून सष्ट होईल. रविवार हा चाकरमान्यांच्या सुट्टीचा दिवस असल्याने त्याचा फायदा घेण्यावर उमेदवारांनी भर दिला. सकाळपासून ते चाकरमान्यांच्या घरी भेट देत होते. सगळीच मंडळी आज भेटतात याचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांची पळापळ होती. १ नोव्हेंबरला मतदान असून त्या आधी १८ आणि २२ व २६ आॅक्टोबर असे तीनच दिवस चााकरमान्यांच्या सुट्टीचे असून त्यापैकी एक रविार गेला. सोमवार ते शनिवार असे सहा दिवस चाकरमानी घरात भेटत नाहीत. म्हणून चाकरमान्यांच्या भेटीगाठी घेण्यावर उमेदवारांनी भर देऊन आपल्यालाच मते देण्याचे आवाहन केले आहे.
भाजपातर्फे जातीच्या कार्डाचा वापर
>कल्याणमधील एक गठ्ठा मते मिळविण्यासाठी भाजपाने कोळी जातीच्या कार्डाचाही वापर केला आहे. कल्याण पश्चिमेतील कोळी समाजाचे प्राबल्य पाहता कोळी समाजाला भाजपाने ९ प्रभागांत उमेदवारी
देऊन सहानभूती मिळविण्याचे राजकारण खेळले आहे.
>प्रभाग -४ (कविता मिरकुटे), प्रभाग ६ (कल्पना गोडे), प्रभाग ७ (भरत) प्रभाग ९ (उपेक्षा भोईर), प्रभाग १० (प्रदीप भोईर), प्रभाग १३ (जनार्दन पाटील), प्रभाग १४ (योगीता पाटील), प्रभाग ४५ (रेखा चौधरी) आणि अपर्णा पाटील (प्रभाग १२) अशा नऊ कोळीबांधवांना उमेवारी दिल्याची माहिती कोळी समाजाचे राज्य उपाध्यक्ष देवानंद भोईर यांनी दिली.
अखेर २७ गावांतला बहिष्कार फुटला गेल्याने रविवारी झालेल्या २७ गाव सर्वपक्षिय संरक्षण संघर्ष समितीने एकमताने उमेदवारांची यादी जाहीर करून शिवसेने समोर एकास एक उमेदवार दिला आहे. यामुळे २७ गावांतली निवडणूक आता रंगतदार होणार असल्याचे संकेत यातून मिळाले आहेत. २१ प्रभागातील दोन बिनविरोध आणि दोन बहिष्काराग्रस्त प्रभाग असल्याने १७ प्रभागात शिवसेना आण संघर्ष समिती असा थेट समाना होईल.

Web Title: Chief Minister will be present in 27 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.