मुख्यमंत्र्यांची प्रदूषण मुक्तीची कळकळ उल्हासनगरातील कचऱ्याने निष्फळ?
By सुरेश लोखंडे | Published: March 1, 2024 09:37 AM2024-03-01T09:37:51+5:302024-03-01T09:38:34+5:30
मुंबई,ठाणेकराची प्रदूषणापासून सुटका व्हावी, सुंदर व स्वच्छ शहर राहावे, नागरिकांचे आयुर्मान, शुद्ध हवा मिळावी यासाठी पर्यावरण पुरक वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करण्याची मोहीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलेली आहे.
ठाणे- मुंबई,ठाणेकराची प्रदूषणापासून सुटका व्हावी, सुंदर व स्वच्छ शहर राहावे, नागरिकांचे आयुर्मान, शुद्ध हवा मिळावी यासाठी पर्यावरण पुरक वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करण्याची मोहीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलेली आहे. स्वतः: झाडू घेऊन साफसफाई केली, गटारांची, नाल्यांची पाहणी करून प्रदूषण मुक्तीची कळकळ व्यक्त केली. त्यांच्या या चळवळीला बहुतांशी ठिकाणी लोकचळवळीची स्वरूप प्राप्त झाले. मात्र उल्हासनगरला अगदी त्याच्या उलट असल्याचे या उद्याना समोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्र्यामुळे उघड झाले आहे.
नागरिकांनी, जाणकारांनी, उद्यांनां समोर, रहदारीच्या मोठ्या रस्त्यांवर कचरा कुंड्या नसाव्या, ठिकठिकाणी असल्या कुंड्या लोकांची वर्दळ नसलेल्या ठिकाणी ठेऊन त्यात कचरा साठणार नाही, पडून राहणार नाही याघी काळजी घेणवयाचे प्रत्यक्ष उल्हासनगर येथील अधिकाऱ्यांना सुचवले. पण जिथे जिथे अशी दुर्गंधी आहे तेथी वाड होताना अधिक दिसून येत आहे. कचरा वेचणाऱ्या महिलां त्यातील योग्य कचरा विकून उदरनिर्वाह करीत आहे. मात्र या कचर्याच्या विल्हेवाटीचा कोटींचा खर्च केवळ फायलींमध्ये रंगवून रस्त्यांवर मात्र कचरा जसाच्या तसा पडून असल्याचे वास्तव उल्हासनगर महानगरपालिका शहरातील ठिकठिकाण रस्त्यांवर दिसून येत आहे. त्याचे हे विदारक दृष्य चिड आणणारे आहे.