‘मुख्यमंत्री रोजगार योजना’ जिल्ह्यात लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:23 AM2019-11-08T00:23:40+5:302019-11-08T00:24:23+5:30
प्रशिक्षणाची सोय : सरकार देणार अनुदान
ठाणे : उद्योग, व्यवसायांमध्ये व्यापक गुंतवणूक होत असल्यामुळे सूक्ष्म लघुउद्योजकांसाठी पूरक उद्योग व्यवसायाच्या संधी ठाणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी प्राप्त व्हाव्यात, यासाठी आता नव्याने ‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम योजना’ ठाणे जिल्ह्यातदेखील राबवण्याचे निश्चित झाले आहे. या संधीचा लाभ मोठ्या संख्येने घेण्याचे आवाहन ठाणे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक वर्षाली बी. सोने यांनी केले आहे.
जिल्ह्यातील युवक-युवतीच्या उद्योगिक प्रगतीसाठी प्रथमच सुरू केलेल्या या योजनेद्वारे कृषी व कृषीवर आधारित उद्योग, उत्पादन व सेवा उद्योग आदी उद्योग प्रकल्पांसाठी संबंधितांची निवड केली जाणार आहे. यामध्ये सेवा क्षेत्रातील प्रकल्पासाठी १० लाख, उत्पादन क्षेत्रासाठी ५० लाख गुंतवणुकीचे प्रकल्प हाती घेणे शक्य होणार आहे.
यासाठी शासनाकडून प्रकल्प मंजुरीच्या १५ ते ३५ टक्के आर्थिक साहाय्य हे अनुदान स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे. या उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी जिल्ह्यातील युवक-युवतींना उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्याची संधी जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा ग्रामोद्योग विभागाने उपलब्ध करून दिली आहे.
५५० जणांना पहिल्या टप्प्यात मिळणार लाभ
च्नुकत्याच सुरू झालेल्या या योजनेद्वारे यंदा जिल्हा उद्योग केंद्राकडून ३२० युवक-युवतींची निवड करून उद्योग व्यवसायाची संधी दिली जाणार आहे. तर, ग्रामोद्योग केंद्रांकडून २३५
युवक-युवतीची निवड
करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.
च्यासाठी लागणाऱ्या प्रोजेक्टसह प्रशिक्षण, बँकेकडून कर्जाची उपलब्धता आदींसाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे.
च्या संधीचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, अधिवास , जातीचा दाखला, प्रशिक्षण सर्टिफिकेट, प्रोजेक्ट रिपोर्ट आदी कागदपत्रांची गरज आहे.
च्याविषयीच्या अधिक माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या ठाणे येथील एमआयडीसी आॅफिस बिल्डिंग कॉम्प्लेक्स, मुलुंड चेकनाका येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.