उल्हासनगरातील मोर्यांनगरी रस्त्याला मुख्यमंत्र्यांचा खोडा - आमदार गणपत गायकवाड

By सदानंद नाईक | Published: September 20, 2023 02:17 PM2023-09-20T14:17:58+5:302023-09-20T14:18:28+5:30

उल्हासनगरातील एकून ७ रस्त्याला एमएमआरडीएने मंजुरी दिली. त्यामध्ये वाको कंपाऊंड ते एसएसटी कॉलेज मार्गे व्हीनस चौक रस्त्याचा समावेश आहे.

Chief Minister's prank on Moryannagari road in Ulhasnagar says Ganpat Gaikwad | उल्हासनगरातील मोर्यांनगरी रस्त्याला मुख्यमंत्र्यांचा खोडा - आमदार गणपत गायकवाड

उल्हासनगरातील मोर्यांनगरी रस्त्याला मुख्यमंत्र्यांचा खोडा - आमदार गणपत गायकवाड

googlenewsNext

उल्हासनगर : शहरातील मोर्यांनगरी रस्त्याची फाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाबून ठेवल्याने, रस्त्याचे काम रखडल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केल्याने खळबळ उडाली. तसेच रस्त्याच्या खड्ड्यात बसून आंदोलन करणाऱ्या प्रहार जनशक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना पाठिंबा जाहीर जाहीर केला.

उल्हासनगरातील एकून ७ रस्त्याला एमएमआरडीएने मंजुरी दिली. त्यामध्ये वाको कंपाऊंड ते एसएसटी कॉलेज मार्गे व्हीनस चौक रस्त्याचा समावेश आहे. या रस्त्यातील मोर्यांनगरी येथील १०० ते १५० फुटाचा रस्ता कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत येत असून संपूर्ण रस्त्याची दुरावस्था झाली आहे. बाप्पाच्या आगमना एक दिवसापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अँड स्वप्निल पाटील, राष्ट्रकल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी, महासचिव राहुल काटकर, धनंजय मिश्रा, प्रितम दुसाणे, प्रहार पक्षाचे उल्हासनगर अध्यक्ष प्रधान पाटील, श्याम भोईर, नितीन महाजन, शरद पोळके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोर्यांनगरी येथील रस्त्याच्या खड्ड्यात बसून आंदोलन केले. रस्ता मंजूर असूनही रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नसल्याच्या निषेधार्थ एमएमआरडीए व महापालिका विरोधात पदाधिकार्यांनी घोषणाबाजी केली. 

आमदार गणपत गायकवाड यांनी रस्त्याच्या खड्ड्यात बसून आंदोलन करणाऱ्याची भेट घेऊन, आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. यावेळी आमदार गायकवाड यांनी रस्त्याच्या श्रेयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फाईल दाबून ठेवल्याने, रस्त्याचे काम राखडल्याचा आरोप केला. खासदार श्रीकांत शिंदे यांना लाभ होण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी रस्त्याचे काम सुरू करणार असल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे. सन-२०१८ साली सदर रस्त्याला मंजुरी आणली होती. त्यावेळी बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे होते. दरम्यान राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर, रस्त्याचा प्रस्ताव रद्द करून नव्याने एमएमआरडीए कडून रस्त्याला मंजुरी मिळाली. मात्र अद्यापही रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याची माहिती आमदार गणपत गायकवाड यांनी दिली आहे. वाको कंपाउंड ते मोर्यांनगरी-एसएसटी कॉलेज मार्गे व्हीनस चौक रस्त्याला एमएमआरडीएने मंजुरी देऊनही रस्त्याचे।काम।सुरू न केल्याने, स्थानिक नागरिकांत नाराजी पसरली आहे. 

भुयारी गटारीच्या कामानंतर रस्त्याचे काम? 
उल्हासनगर महापालिका भुयारी गटारीच्या टप्पा क्रं-२ च्या कामाला मंजुरी मिळाली आहे. भुयारी गटारीच्या कामानंतर रस्त्याचे काम सुरू होणार आहे. तसेच मोर्यांनगरी रस्त्याचा भाग कल्याण महापालिका हद्दीत येत असल्याने, त्यांनाही भुयारी गटारीचे काम करण्याचे एमएमआरडीएने सुचविल्याचे समजते.

 

 

Web Title: Chief Minister's prank on Moryannagari road in Ulhasnagar says Ganpat Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.