तळोजा एमआयडीसी- बदलापूर पाइपलाइन रस्त्याच्या कामाला मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:57 AM2018-03-07T11:57:07+5:302018-03-07T11:59:14+5:30

शीळ-कल्याण आणि शीळ-तळोजा रस्त्याला उत्तम पर्याय असलेल्या तळोजा एमआयडीसी-उसाटणे-बदलापूर पाइपलाइन रस्त्याची झालेली दुरवस्था खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वारंवार एमएमआरडीएच्या निदर्शनास आणली होती. त्यानूसार एमएमआरडीएने या रस्त्याचे काम करण्यास सकरात्मक प्रतिसाद दिला असून त्या कामाचा अहवाल मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे.

Chief Minister's signature for the work of Taloja MIDC-Badlapur pipeline road | तळोजा एमआयडीसी- बदलापूर पाइपलाइन रस्त्याच्या कामाला मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीची प्रतिक्षा

 एमएमआरडीए आयुक्तांनी युपीएस मदान यांची खासदार श्रीकांत शिंदेंना माहित

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर  एमएमआरडीए आयुक्तांनी युपीएस मदान यांची खासदार श्रीकांत शिंदेंना माहिती

डोंबिवली : शीळ-कल्याण आणि शीळ-तळोजा रस्त्याला पर्याय असलेल्या तळोजा एमआयडीसी-उसाटणे-बदलापूर पाइपलाइन रस्त्याची झालेली दुरवस्था खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वारंवार एमएमआरडीएच्या निदर्शनास आणली होती. त्यानूसार एमएमआरडीएने या रस्त्याचे काम करण्यास सकरात्मक प्रतिसाद दिला असून त्या कामाचा अहवाल मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. त्यांची मंजुरी मिळताच या कामाला सुरुवात करण्याची ग्वाही एमएमआरडीए आयुक्त यूपीएस मदान यांनी खा. डॉ. शिंदे यांना सोमवारी झालेल्या बैठकीत दिली.
त्याचबरोबर शहाड जंक्शन येथील सुमारे ३०० कोटी रुपयांचे कामही एमएमआरडीएच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. शीळ-कल्याण आणि शीळ-तळोजा रस्त्यावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्यामुळे या रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी होते. बदलापूर पाइपलाइन-उसाटणे-तळोजा एमआयडीसी हा रस्ता शीळ-कल्याण आणि शीळ-तळोजा रस्त्याला चांगला पर्याय असल्यामुळे त्या मागार्चा वापरही मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र, गेल्या काही काळापासून या रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यासाठी शिंदे पाठपुरावा आहेत. मुख्यमंत्र्यांकडेही त्यांनी पत्राद्वारे मागणी केली होती.
या बैठकीत कल्याण-मुरबाड, कल्याण-बदलापूर आणि कल्याण-पुणा लिंक रोड या तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या जंक्शनवर (वाय जंक्शन) उड्डाणपुल करण्यासंदर्भातही चर्चा झाली. त्यानुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेने या उड्डाणपुलासाठी २९० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून एमएमआरडीएला सादर केला आहे. हा अहवालही लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येईल,असे मदान यांनी अश्वस्थ केल्याचे शिंदे म्हणाले.
 कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांपैकी १० गावांमध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून ग्रोथ सेंटर विकसित करण्यात येत आहे. मात्र, सध्या या गावांमधील रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे या गावांमध्ये तातडीने रस्त्यांची कामे हाती घेण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी एमएमआरडीएकडे केली होती. त्यानुसार याबाबतच्या प्रस्तावाला एमएमआरडीएने मान्यता दिली असून अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्तावही मुख्यमंत्र्यांच्या दरबारी असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Chief Minister's signature for the work of Taloja MIDC-Badlapur pipeline road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.