ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या पल्हेमध्ये बालविवाह रोखला
By सुरेश लोखंडे | Published: February 28, 2024 09:39 PM2024-02-28T21:39:59+5:302024-02-28T21:40:09+5:30
बालिकेच्या पालकांकडून बालिका १८ वर्षे पूर्ण होत नाही तोपर्यंत तिचे लग्न करणार नाही असे बंधपत्र लिहून घेण्यात आले.
ठाणे : जिल्ह्यातील पल्हे ता. मुरबाड येथे अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या सतर्क यंत्रणेने आत रोखला. त्यामुळे गांवकर्यांमध्ये तर्कवितर्क काढले जात आहेत.
या बालविवाह विषयी ठाणे अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष ठाणे यांना समजली असता त्यांनी ही माहिती शहापूर - मुरबाड संरक्षण अधिकारी यांना दिली. सहाय्यक संरक्षण अधिकारी यांनी मुलीच्या महाविद्यालय येथे जाऊन तिच्या वयाबाबत शहानिशा केली व मुलीबाबत पूर्ण माहिती घेत ज्याठिकाणी लग्न होत आहे त्या जागेची शहानिशा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २८ फेब्रुवारीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेन्द्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा बालविवाह रोखला.
या बालविवाह रोखण्यासाठी दरम्यान टोकाकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सहकार्याने संरक्षण अधिकारी युवराज वडेकर, चाईल्ड लाईफ घ्या श्रद्धा नारकर सहाय्य संरक्षण अधिकारी अंकुश शिंदे, यांचे पूर्ण पथक तेथे पोचले तिथे हळदीची तयारी चालू होती. या ठिकाणी पथका मार्फत बालविवाह संदर्भात पालक आणि मुलगी यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर त्यांना बालकल्याण समितीच्या अध्यक्षांच्या रसोबत व्हिडिओ कॉल करून मुलीशी संवाद साधून देण्यात आले. त्याचप्रमाणे बाल कल्याण समितीने मुलीस व पालकास यांना हजर राहण्यास सांगितले आहे. तसेच बालिकेच्या पालकांकडून बालिका १८ वर्षे पूर्ण होत नाही तोपर्यंत तिचे लग्न करणार नाही असे बंधपत्र लिहून घेण्यात आले.