पालिका रूग्णालयात बाळंतिणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 02:32 AM2018-09-11T02:32:38+5:302018-09-11T02:32:45+5:30

मीरा रोडच्या पालिका रूग्णालयात एका बाळंतीणीच्या मृत्यू प्रकरणी भार्इंदर पोलिसात तिच्या पतीने तक्रार केली आहे.

Childbirth death in municipality | पालिका रूग्णालयात बाळंतिणीचा मृत्यू

पालिका रूग्णालयात बाळंतिणीचा मृत्यू

Next

मीरा रोड : मीरा रोडच्या पालिका रूग्णालयात एका बाळंतीणीच्या मृत्यू प्रकरणी भार्इंदर पोलिसात तिच्या पतीने तक्रार केली आहे. हलगर्जीपणा व रु ग्णालयात आयसीयू सुविधा असती तर महिलेचे प्राण वाचले असते असा आरोप निकटवर्तीयांनी केला आहे.
भार्इंदरला सुदामानगरमध्ये राहणारी सुनीता यादव (२७) ही गरोदर असल्याने पाच सप्टेंबरला तिला बाळंतपणासाठी मीरा रोडच्या पालिका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी नॉर्मल बाळंतपण होणार नाही म्हणून सांगितल्याने सीझेरियन करण्यात आले. सायंकाळी सुनीता प्रसूत होऊन तिला मुलगी झाली. आई व बाळ दोघेही सुखरूप होते. दुसऱ्या दिवशी सुनीताने पाणी मागितले व गरम होत असल्याचे सांगितले.
पती विनोद पंखा आणण्यास गेले असता मेव्हणीने फोन करून सुनीताची प्रकृती अचानक बिघडल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तिला दुसºया रूग्णालयात हलवण्यास सांगितले. परंतु नेले असता तिचा आधीच मृत्यू झाला होता.
>प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ . प्रमोद पडवळ यांनी मात्र प्रसूती व्यवस्थित होऊन आई व बाळ व्यवस्थत होते. त्यामुळे डॉक्टरांचा हलगर्जीपणा म्हणता येणार नाही. वैद्यकीय कारणांमुळे अचानक प्रकृती बिघडू शकते. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण कळेल असे सांगितले.

Web Title: Childbirth death in municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू