बालमहोत्सवात अवयवदानाची जाणीव
By Admin | Published: December 7, 2015 12:40 AM2015-12-07T00:40:01+5:302015-12-07T00:40:01+5:30
समन्वय प्रतिष्ठान आयोजित वसंत बालमहोत्सव हा कार्यक्रम शुक्रवारी दादोजी कोंडदेव स्टेडियमवर पार पडला. या महोत्सवात अवयवदान यासारख्या सामाजिक प्रश्नाविषयी कुमारवयीन मुलांना जाणीव करून
ठाणे : समन्वय प्रतिष्ठान आयोजित वसंत बालमहोत्सव हा कार्यक्रम शुक्रवारी दादोजी कोंडदेव स्टेडियमवर पार पडला. या महोत्सवात अवयवदान यासारख्या सामाजिक प्रश्नाविषयी कुमारवयीन मुलांना जाणीव करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.
या वेळी वैशाली सामंत यांनी अल्बममधील गाणे गाऊन आपली उपस्थिती दर्शवली. त्यानंतर, इंडियाज गॉट टॅलेंंटमधील स्पर्धक अक्षत सिंग याने त्याच्या आवडत्या सल्लूभाईचे कौतुक करून आपल्याला पण सलमानभाईसारखे सुपरस्टार व्हायचे आहे, असे सांगितले. बजरंगी भाईजानमधील मुन्नी म्हणजेच हर्षली मल्होत्रा हिने बजरंगी भाईजानमधील हो किंवा नाही कसे केले, याचे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविले. त्यानंतर, इंडियन आयडॉल ज्युनियर-२ मधील नित्याश्री व्यंकटरमन चेन्नईमध्ये पूरस्थिती असल्याने येऊ शकली नाही. मात्र, अनन्या नंदा हिने हर किसीको नही मिलता यहा प्यार जिंदगीने... आदी गाणी सादर केली. या वेळी मोती खान याच्या राजस्थानी गीतांनी रसिकांना खिळवून ठेवले. जय मल्हारमधील शनय भिसे याने सूत्रसंचालन करणाऱ्या डबिंग आर्टिस्ट मेघना एरंडे यांना डोरेमॉनच्या आवाजात गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी पीकाचू, डोरेमॉन, चुलबुली आदी कार्टुन्सचे आवाज काढून लहान मुलांचे मनोरंजन केले. धारावीच्या मुलांनी रॉक बॅण्ड सादर केला. या वेळी खुलके बोल, दिलसे बोल, धारावी के संग तू बोल असे म्हणत रॉक बॅण्डची सुरुवात केली. धंपी हे पात्र रंगवून विशाखा सुभेदार यांनी मुलांचे मनोरंजन केले.
अवयवदानासाठी प्रत्येक शाळेत जी आशापेटी ठेवली होती, त्यातून आलेले सर्व पैसे हे मुलांच्या पॉकेटमनीतील होते. मुलांना सामाजिक कार्यात हातभार लावण्याची सवय व्हावी, यासाठी या पेटीचे आयोजन केले होते. हे सर्व पैसे धनादेशाच्या स्वरूपात ज्यांना अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांना दिले.
या वेळी कन्येचे अकाली निधन झाल्यानंतर तिच्या अवयवांचे दान करणाऱ्या मुंबईच्या माजी महापौर निर्मला सावंत-प्रभावळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी नेते वसंत डावखरे, पालकमंत्री एकनाथ श्ािंदे, खा. श्रीकांत शिंदे, माजी पालकमंत्री गणेश नाईक, पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, महापौर संजय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.