ठाणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील बालकांसाठी पार पडला ‘ वजन महोत्सव ’; तत्परतेने घेतल्या बालकांच्या आरोग्याच्या नोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 07:07 PM2018-04-14T19:07:22+5:302018-04-14T19:07:22+5:30
समाजातील भावी पिढीला सुदृढ व सक्षम बनवण्यासाठी प्रथम त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. रोग झाल्यावर त्यावर औषधोपचार करण्याऐवजी रोग होणारच नाही यासाठी दक्षता घेऊन आरोग्य तंदुरु स्थ कसे राहील याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे
ठाणे : बालकांचे वजन घेऊन बालकांची पोषनस्थिती निश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये आज वजन महोत्सवाचे पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन भिवंडी तालुक्यातील सरवली येथे ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती दर्शना ठाकरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार याचे हस्ते करण्यात आले.
यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महोत्सवाची सुरु वात करण्यात आली. जिल्हह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये हा वजन महोत्सव पार पडला. अंगणवाडीच्या परिसरातील शुन्य ते सहा वयोगटातील मुलांचे वजन करण्यासाठी पालकांसह मातांनी उपस्थित राहून या महोत्सवाचा उत्स्फुर्तपणे लाभ घेतला. समाजातील भावी पिढीला सुदृढ व सक्षम बनवण्यासाठी प्रथम त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. रोग झाल्यावर त्यावर औषधोपचार करण्याऐवजी रोग होणारच नाही यासाठी दक्षता घेऊन आरोग्य तंदुरु स्थ कसे राहील याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे सलोख मार्गदर्शन भीमनवार यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना केले.
अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्य सेविका आणि आशा आदींच्या समन्वयाने जिल्ह्यातील अंगणवाड्यामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. बालकांचे आरोग्य व पोषण, त्यांच्या आरोग्याच्या नोंदींची योग्य पद्धत, आरोग्य नोंदीची आवश्यकता आदींचे सखोल मार्गदर्शन महिला व बालकल्याण अधिकारी संतोष भोसले यांनी उपस्थिताना केले. या कार्यक्र माला जिल्हा परिषद सदस्य केणे मॅडम, भिवंडी पंचायत समिती सदस्य सुरेंद्र भोईर, सरपंच भाविका ठाकरे, उपसरपंच अनिता चौधरी, गट विकास अधिकारी अविनाश मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरु लता धानके आदींसह अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचारी आदींंची यावेळी मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती.