आईचे प्रेमसंबंध सहन न झाल्याने मुलांनी चॉपरने वार करुन प्रियकराची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 12:47 PM2017-12-25T12:47:05+5:302017-12-25T12:58:16+5:30

आई बरोबर प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून मुलांनी अब्दुल हाफिझ अन्सारीची (50) चॉपरने भोसकून हत्या केली.

The children beat up their loved ones by chattering their mother's love affair | आईचे प्रेमसंबंध सहन न झाल्याने मुलांनी चॉपरने वार करुन प्रियकराची केली हत्या

आईचे प्रेमसंबंध सहन न झाल्याने मुलांनी चॉपरने वार करुन प्रियकराची केली हत्या

Next
ठळक मुद्देअब्दुल चहा पिऊन घरी परतत असताना आरोपींनी त्याला गाठले व त्याच्यावर चॉपरने सहा ते सात वार  केले. सरर्फराझ आणि सैफ एका हातमाग कारखान्यात मजुरीचे काम करतात.

ठाणे - आई बरोबर प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून मुलांनी अब्दुल हाफिझ अन्सारीची (50) चॉपरने भोसकून हत्या केली. शनिवारी रात्री भिवंडीमध्ये ही घटना घडली.  अब्दुल अन्सारी आरोपींच्या शेजारी रहात होता. त्याचे आरोपींच्या आईबरोबर प्रेमसंबंध होते. त्याचा रागातून सरफराझ शेख (25) आणि सैफ शेख (27) या दोघांनी अब्दुल अन्सारीची हत्या केली. 

अब्दुल चहा पिऊन घरी परतत असताना आरोपींनी त्याला गाठले व त्याच्यावर चॉपरने सहा ते सात वार  केले. अब्दुल एका रेशनिगच्या दुकानात मदतनीस म्हणून काम करायचा. सरफराझ आणि सैफ एका हातमाग कारखान्यात मजुरीचे काम करतात. अब्दुलची हत्या करुन सरफराझ आणि सैफ घटनास्थळावरुन पसार झाले. 

स्थानिकांनी रक्ताच्या थारोळयात कोसळलेल्या अब्दुललला उचलून भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी सैफला भिवंडी येथून अटक केली. सरफराझ अजूनही फरार आहे. अब्दुल अन्सारीचे आरोपींच्या आईबरोबर प्रेमसंबंध होते त्याच रागातून त्यांनी हत्या केली असे तपास अधिकारी रमेश यादव यांनी सांगितले.             
 

Web Title: The children beat up their loved ones by chattering their mother's love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा