मोबाइल गेममुळे मुले हिंसक; डोंबिवलीतील टिळकनगर शाळेचे सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 12:36 AM2019-02-10T00:36:14+5:302019-02-10T00:36:43+5:30

पबजी, फ्री फायर यासारख्या मोबाइल गेमच्या दुष्टचक्रात अडकून मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढीस लागली असल्याचे टिळकनगर शाळेतील शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

Children play violent due to mobile games; Tilaknagar school survey in Dombivli | मोबाइल गेममुळे मुले हिंसक; डोंबिवलीतील टिळकनगर शाळेचे सर्वेक्षण

मोबाइल गेममुळे मुले हिंसक; डोंबिवलीतील टिळकनगर शाळेचे सर्वेक्षण

Next

- जान्हवी मोर्ये

डोंबिवली : पबजी, फ्री फायर यासारख्या मोबाइल गेमच्या दुष्टचक्रात अडकून मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढीस लागली असल्याचे टिळकनगर शाळेतील शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. ही बाब घातक असल्याने त्याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शाळेने पालक उद्बोधन सभा घेतली. त्यामध्ये गेममुळे मेंदूच्या पेशींवर होणारा परिणाम आणि त्यातून घडणारे मानसिक आणि वर्तनातील बदलांचे समुपदेशकांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करून पालकांना पुढील धोक्यांची जाणीव करून दिली.
मोबाइल गेममुळे अनेक अनुचित घटना रोजच कानांवर पडत असतात. त्यापासून विद्यार्थ्यांना परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करणारी टिळकनगर ही पहिली शाळा ठरली आहे. मुले हिंसक का वागतात? यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केला. त्यामध्ये विभक्त कुटुंबपद्धती, आईवडिलांतील वाद, घटस्फोट, एकल पालकत्व, अतिलाड याव्यतिरिक्त मोबाइल व आॅनलाइन गेममुळे मुलांच्या वर्तनात बदल होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
पाचवी आणि नववीचे विद्यार्थी पबजी, फ्री फायर आणि तत्सम गेम्स किती प्रमाणात खेळतात, हे शिक्षकांनी त्यांच्याकडूनच जाणून घेतले. याबाबत, विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी मन मोकळे केले. या गेमच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहून शिक्षकही आश्चर्यचकित झाले. सद्सद्विवेकबुद्धी नष्ट करणाऱ्या आणि थ्रील अनुभवण्यासाठी आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घ्यायला भाग पडणाºया या गेमचा अभ्यास करण्याच्या सूचना शाळेने शिक्षकांना केल्या होत्या. त्यानुसार प्रज्ञा बापट, लीना ठाकूर, मनीषा केंद्रे, लीना दाणी यांनी विविध गेमची माहिती, लेख, विविध माध्यमांतून जमा केली. त्यावरून एक प्रकल्प तयार करून शुक्रवारी पालकांसाठी उद्बोधन सभा घेतली. पाचवी ते आठवी आणि आठवी ते नववी अशा दोन सत्रांत ही सभा झाली. शाळेचा हा उपक्रम स्तुत्य आहे. मोबाइलपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी शाळेने सतत असे उपक्रम राबवायला हवेत, असे संस्थेचे कार्यवाहक डॉ. महेश ठाकूर म्हणाले.

घातक गेमवर भारतातही बंदी हवी
‘एकुलत्या एक मुलांना हवे ते द्या’ या वृत्तीमुळे पालकांचे मुलांच्या वर्तनातील बदलाकडे दुर्लक्ष होत आहे. या फेºयातून युवा पिढीला बाहेर काढण्यासाठी जपान, चीन यासारख्या पूर्वेतील देशांनी घातक मोबाइल गेमवर बंदी घातली आहे.
याप्रमाणे भारतातही बंदी आणली पाहिजे. तसेच पालक आणि शिक्षकांनीही जबाबदारी घेऊ न मुलांशी सतत याविषयी बोलायला हवे. चांगले नागरिक घडवण्यासाठी हे आवश्यक असल्याचे मत टिळकनगर शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पुणतांबेकर यांनी व्यक्त केले.

पालकच आपल्या मुलांना मोबाइल देतात. त्यानंतर, त्यांना गेम खेळण्याची सवय लागते. अनेक विद्यार्थी तर शाळेत जाण्यासाठी रिक्षाला दिलेले पैसे सायबर कॅफेत जाऊ न खर्च करतात आणि दांडी मारतात. त्यांनी यावेळी गेममुळे मेंदूच्या पेशींवर ताण पडून मुले हिंसक बनत आहेत.
- श्वेता बंगाली, समुपदेशक, टिळकनगर शाळा

Web Title: Children play violent due to mobile games; Tilaknagar school survey in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.