शिकवणी वर्गात मास्कविना मुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:41 AM2021-04-08T04:41:02+5:302021-04-08T04:41:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : सरकारच्या नियमाचे उल्लंघन करून कॅम्प नं ४ परिसरात शिकवणी वर्ग चालविण्याचा भंडाफोड करून कारवाई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : सरकारच्या नियमाचे उल्लंघन करून कॅम्प नं ४ परिसरात शिकवणी वर्ग चालविण्याचा भंडाफोड करून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत चंदनशिवे यांनी केली आहे. शिकवणी वर्गातील मुलांसह शिक्षक विनामास्क असल्याने कोरोना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उल्हासनगरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने सरकारने कडक निर्बंध लागू केले. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त दुकाने, शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग बंद केले. या नियमांचे उल्लंघन करून कॅम्प नं. ४, गुरुनानक शाळेजवळील एक शिकवणी वर्ग सुरू होता. याबाबतची माहिती चंदनशिवे यांना मिळाल्यावर त्यांनी शिकवणी वर्ग बंद करण्यास सांगितले. तसेच याबाबतची माहिती प्रभाग समिती क्र. ४ च्या सहायक आयुक्तांना दिली. शिकवणी वर्गातील मुले व शिक्षक विनामास्क असल्याने त्यांना कोरोना संसर्गाची शक्यता त्यांनी व्यक्त केली. चंदनशिवे यांच्यासह नियाझ अन्सारी, प्रवीण करीरा, प्रवीण दळवी आदी उपस्थित होते.