ठाण्यातील संगीत कट्टयावर रंगली बालकलाकारांची "संगीताची बालमैफिल"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 03:53 PM2018-12-02T15:53:22+5:302018-12-02T15:54:35+5:30

संगीत कट्टयावर किरण नाकती यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने दर्जेदार सादरीकरणे पाहायला मिळत आहेत.

Children's Music on Thane Music Cast: "Music Balmafil" | ठाण्यातील संगीत कट्टयावर रंगली बालकलाकारांची "संगीताची बालमैफिल"

ठाण्यातील संगीत कट्टयावर रंगली बालकलाकारांची "संगीताची बालमैफिल"

Next
ठळक मुद्देसंगीत कट्टयावर रंगली बालकलाकारांनी "संगीताची बालमैफिल"प्रेक्षकांना घडले बालकलाकारांमधील कलेचे दर्शनलहान मुलांच्या निरागस आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे आजचा कट्टा समृद्ध - किरण नाकती

ठाणे : ठाण्यातील संगीत कट्टयावर अभिनय कट्ट्याच्या बालकलाकारांनी "संगीताची बालमैफिल" हा कार्यक्रम सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी बालकलाकारांमधील कलेचे दर्शन प्रेक्षकांना घडले. 

        यात मैत्रेय दिवाडकर याने पेटी वाजवत अनेक गाणी सादर केली.अखिलेश जाधव याने छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर करत उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. परी पिंगळे, चिन्मय मोर्य,अखिलेश जाधव यांनी "ओ मेरी माँ" या गाण्यावर नृत्य सादर केले.स्वरा जोशी हिने "बागड बम" या गाण्यावर नृत्य सादर केले.आदेश लाटे याने तबला वादन करत, संगीत देखील माणसाशी बोलू शकतं याचे जिवंत उदाहरण दिले. ईरा राख हिने "जुळता जुळता जुळतय कि" या मालिकेतील गाण्यावर नृत्य सादर केले.राज सिनलकर याने "क्या हुवा तेरा वादा","निले निले अंबर पे" हि गाणी कीबोर्डवर वाजवत सादर केली.अनमोल दिवाडकर याने पियानोवर विविध गाणी सादर केली.निखिल मोरे व सेजल जगताप यांनी आजच्या युगातील मॉडर्न कृष्णलीला सादर करत "कान्हा" या गाण्यावर नृत्य सादर केले. या नृत्याचे दिग्दर्शन पवन जाधव या कट्ट्याच्या कलाकाराने केले होते. यावेळी दीपप्रज्वलन अभिनय कट्ट्याच्या सर्व बालकलाकारांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी केले. रसिकांना एक आगळा वेगळा अनुभव घेता यावा या भावनेतुनच आजचा संगीत कट्टा बालकलारांना घेऊन करण्यात आला.या लहान मुलांच्या निरागस आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे आजचा कट्टा समृद्ध झाला अश्या भावना किरण नाकती यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Web Title: Children's Music on Thane Music Cast: "Music Balmafil"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.