डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने सफाळेत चिमुरडीचा मृत्यू?

By admin | Published: November 14, 2015 01:57 AM2015-11-14T01:57:28+5:302015-11-14T01:57:28+5:30

सफाळे (माकणे) येथील सेजल राजु घरत या ९ वर्षीय मुलीला अन्नातुन विषबाधा झाल्याने सफाळे येथीलच डॉ. गोखले यांच्या समृद्धी क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आले.

Chimaridi death doctor's death? | डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने सफाळेत चिमुरडीचा मृत्यू?

डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने सफाळेत चिमुरडीचा मृत्यू?

Next

पालघर : सफाळे (माकणे) येथील सेजल राजु घरत या ९ वर्षीय मुलीला अन्नातुन विषबाधा झाल्याने सफाळे येथीलच डॉ. गोखले यांच्या समृद्धी क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारासाठी डॉक्टर वेळीच उपस्थित न झाल्याने तिचा मत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांसह उपस्थित जमावाने करीत मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यामुळे वातावरण तंग बनले होते.
माकणे येथील सेजल हिने बुधवारी रात्री घरीच तयार केलेले खाडीतील माशाचे कालवण खाल्ले. मात्र, तिच्या पोटात मळमळ सुरू होऊन तिला उलट्या सुरू झाल्या. घरातील लोकांनी तिच्यावर घरगुती उपाययोजना केली. पहाटे पुन्हा तिला उलट्या सुरू झाल्याने गुरुवारी उपचारासाठी सफाळ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. त्यावेळी उपस्थित डॉ. रणदिवे यांनी तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे टोलफ्री क्र. १०८ वर फोन करून अ‍ॅम्ब्युलन्सही मागविल्याचे डॉ. रणदिवेंनी सांगितले. दरम्यानच्या काळात एका नातेवाईकानी सफाळे येथीलच समृद्ध क्लिनीक चे डॉक्टर संजय गोखले यांच्याकडे सेजलला उपचारासाठी नेले. त्यावेळी डॉ. गोखले यांना क्लिनीकमध्ये येण्यास थोडा उशीर झाल्याने उपचाराअभावी सेजलचा मृत्यू झाला, असा आरोप करीत नातेवाईकांसह मोठा जमाव डॉ. गोखलेंच्या क्लिनीकमध्ये जमा होऊ लागला.
क्लिनीकमधील साहित्याचीही उपस्थित जमावाने तोडफोड करीत डॉक्टरांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबळे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देत उपस्थितांशी चर्चा केली. या प्रकरणात दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. याचा रिपोर्ट आल्यानंतर सेजलच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याचे बजबळे यांनी सांगितल्यानंतर जमावाची पांगापांगा झाली. या संदर्भात डॉ. रणदिवे यांच्याशी संपर्क साधला असता सेजलने खाल्लेले मासे हे रासायनिक मिश्रीत दुषीत मासे होते की काय याचा शोध घेण्याबरोबरच उलटीनंतर तिच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तीने प्रथमोपचाराला योग्य प्रतिसाद न दिल्याने रूग्णाला पालघरच्या ग्रामीण रूग्णालयातील तज डॉक्टरांकडे नेण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले. सध्या सफाळे पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे सफाळे पोलीसांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Chimaridi death doctor's death?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.