China Coronavirus : कोरोना व्हायरसच्या उपाययोजनांबाबत महापौरांची तातडीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 02:42 PM2020-03-05T14:42:27+5:302020-03-05T14:43:15+5:30

China Coronavirus : महापालिकेने आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात असे आदेश देवून नागरिकांनी घाबरु नये असे आवाहन देखील यावेळी केले.

China Coronavirus: thane Mayor's emergency meeting on Corona virus solutions | China Coronavirus : कोरोना व्हायरसच्या उपाययोजनांबाबत महापौरांची तातडीची बैठक

China Coronavirus : कोरोना व्हायरसच्या उपाययोजनांबाबत महापौरांची तातडीची बैठक

googlenewsNext

ठाणे - चीनसह अनेक देशामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून अनेक नागरिक बळी पडले आहे. भारतात देखील कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्यामुळे सर्वत्र भीतीचे सावट पसरले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने खबरदारी घेत कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्यास त्यावर तातडीने उपचार करणेसाठी खबरदारी घेतली आहे. या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी आज प्रभारी आयुक्त राजेंद्र ‍ अहिवर यांच्याशी चर्चा करुन महापौर दालन येथे वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिरुध्द माळगांवकर, वैद्यकीय अधीक्षक प्रकाश सोनालीकर व अधिष्ठाता शैलेश्वर नटराजन यांचेसमवेत बैठक घेतली. 

महापालिकेने आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात असे आदेश देवून नागरिकांनी घाबरु नये असे आवाहन देखील यावेळी केले. इटली, इराण, थायलंड, साऊथ कोरिया, मलेशिया या ठिकाणाहून भारतात नागरिक येत असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी दररोज मुंबई ‍आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने संपर्क साधण्यात येतो. आलेल्या प्रवाशांची भेट घेऊन त्यांची चौकशी करुन त्यांच्यासोबत 14 दिवस संपर्क साधला जात असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. ‍ अनिरुध्द माळगांवकर यांनी बैठकीत सांगितले.  

महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळल्यास यासाठी छत्रपत्री   शिवाजी महाराज रुग्णालयात 8 खाटांचा  विलगीकरण कक्ष उपलब्ध करण्यात आला आहे. या कक्षात उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी  दीड हजार एन 95 मास्क  व जवळपास दीड लाख सर्जिकल मास्कची व्यवस्था करण्यात आली आहे. या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी व याबाबत घ्यावयाची खबरदारी या संदर्भातील माहिती देणारी भित्तीपत्रके लावण्यात यावी तसेच वर्तमानपत्रातून देखील याबाबत आवश्यक माहिती प्रसिध्द करावी तसेच स्थानिक वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात यावे असे आदेश देत महापालिकेने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये या आजाराचा फैलाव होवू नये यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून  सद्यस्थीतीत उपलब्ध असलेला  औषध साठा रुग्णालये व आरोग्य केंद्रामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन ठेवला आहे. याबाबत महापालिकेने पूर्ण खबरदारी घेतली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.  तसेच या आजारासंदर्भात रुग्णांवर करण्यात येणार उपचार व घ्यावयाची काळजी याबाबत तज्ञ डॉक्टरांच्या पथकांनी महापालिकेच्या विविध रुगणालयातील डॉक्टरांना मार्गदर्शन केले असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले. तसेच दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक  काळजी घेतल्यास निश्चीतच आपण या आजारावर मात करु शकतो यासाठी सर्व नागरिकांना विनाकारण घाबरुन न जाता स्वत:ची व आपल्या आजूबाजूच्या  नागरिकांची काळजी घ्यावी व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे देखील महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus: देशभरात 29 लोकांना कोरोना व्हायरसची बाधा, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

Big Breaking : भारतीय महिला संघाची ICC Women's T20 World Cupच्या अंतिम फेरीत धडक

China Coronavirus : आता 'कोरोना'लाही विम्याचं कवच? कंपन्यांकडून तयारी सुरू

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर पाच वर्षांत 446 कोटींचा खर्च

 

Web Title: China Coronavirus: thane Mayor's emergency meeting on Corona virus solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.