China Coronavirus : ठाणे महानगरपालिका देखील कोरोना विरोधात सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 01:39 PM2020-03-05T13:39:54+5:302020-03-05T13:40:38+5:30

China Coronavirus : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 3,286  जणांचा मृत्यू झाला असून 95,484 हून अधिक लोकांना त्यांचा संसर्ग झाला आहे.

China Coronavirus: Thane Municipal Corporation is also ready against Corona | China Coronavirus : ठाणे महानगरपालिका देखील कोरोना विरोधात सज्ज

China Coronavirus : ठाणे महानगरपालिका देखील कोरोना विरोधात सज्ज

Next

ठाणे - वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 3,286  जणांचा मृत्यू झाला असून 95,484 हून अधिक लोकांना त्यांचा संसर्ग झाला आहे. जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. भारतात देखील कोरोनाचे 29 रुग्ण आढळले आहेत. योग्य ती काळजी घेतल्यास कोरोनापासून आपला बचाव करता येऊ शकतो. ठाणे महानगरपालिका देखील कोरोना विरोधात सज्ज झाली आहे.    

'ठाण्यामध्ये जर परदेशातून येणारे कोणी नागरिक असतील तर एअरपोर्टकडून आम्ही माहिती घेतो, त्यांना आम्ही कस्तुरबा रुग्णालयामध्ये पाठवत आहोत, 14 दिवस त्यांचे उपचार आणि देखरेख करत आहोत. असे 11 लोक आले होते, त्यांची चाचणी झाली, ते सुरक्षित आहेत,एक संशयित रुग्ण महिला पुण्याहून आली होती, तिची चाचणी केली, ती निगेटिव्ह आली आहे. कळवा येथील रुग्णालयामध्ये 8 बेडचा नवीन वॉर्ड सज्ज आहे. तसेच 45 हजार मास्क तयार असून औषध आधीच आणून ठेवली गेली' अशी माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली आहे. 

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही काही संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरूवारी राज्यसभेत काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी कोरोना व्हायरससंबंधी मुद्दा उपस्थित केला. याला उत्तर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले. यावेळी कोरोना व्हायरससंबंधी सर्व प्रकरणावर लक्ष ठेवण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. देशात आतापर्यंत 29 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. विदेशातून आलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचे संक्रमण झाले आहे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus: देशभरात 29 लोकांना कोरोना व्हायरसची बाधा, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

Big Breaking : भारतीय महिला संघाची ICC Women's T20 World Cupच्या अंतिम फेरीत धडक

China Coronavirus : आता 'कोरोना'लाही विम्याचं कवच? कंपन्यांकडून तयारी सुरू

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर पाच वर्षांत 446 कोटींचा खर्च

China Coronavirus : 'राहुल गांधींनी कोरोना चाचणी केली का?', भाजपा खासदाराचा सवाल

Web Title: China Coronavirus: Thane Municipal Corporation is also ready against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.