चिंचघरला प्रश्नपत्रिका २ तास उशिरा

By admin | Published: March 17, 2017 05:47 AM2017-03-17T05:47:50+5:302017-03-17T05:47:50+5:30

तालुक्यातील चिंचघर येथील ह. वि.पाटील विद्यालयात दहावी परिक्षेचे केंद्र असून आज भूमितीचा पेपर होता. मात्र परीक्षा मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे तब्बल दोन तास

Chinchaghar question papers are 2 hours late | चिंचघरला प्रश्नपत्रिका २ तास उशिरा

चिंचघरला प्रश्नपत्रिका २ तास उशिरा

Next

वाडा : तालुक्यातील चिंचघर येथील ह. वि.पाटील विद्यालयात दहावी परिक्षेचे केंद्र असून आज भूमितीचा पेपर होता. मात्र परीक्षा मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे तब्बल दोन तास उशिराने प्रश्नपत्रिका आल्याने विद्यार्थांना ताटकळत बसावे लागले. या यामुळे पालक चांगलेच संतापले असून याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गुरूवारी भूमितीचा दोन तासांचा पेपर होता. तालुक्यातील सर्व केंद्रांच्या प्रश्नपत्रिका वाडा कस्टडीमध्ये जाऊन घेतल्या जातात. चिंचघर येथे ह.वि.पाटील विद्यालयात सहा शाळांचे ८२३ विद्यार्थी या विषयाची परीक्षा देत आहेत. पैकी १२९ विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे तर २११ विद्यार्थी सेमी इंग्रजी माध्यमाचे आहेत. आज सकाळी या परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यावर लिलाफे उघडले असता इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका आल्या नसल्याचे केंद्र प्रमुखांच्या लक्षात आले.
त्यानंतर चिंचघर येथील शिक्षण संस्थेचे सदस्य श्रीकांत भोईर व नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मुस्तफा मेमन यांनी तातडीने लक्ष घालून केंद्र प्रमुखांकडे चौकशी केली असता ही चूक बोर्डाकडून झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर केंद्र प्रमुखांसह सर्वांनी धावाधाव केली असता बोर्डाकडून एक प्रश्नपत्रिका आॅनलाईन देण्यात आली. त्यानंतर तिच्या एका खासगी दुकानात झेरॉक्स काढून नंतर विद्यार्थांना त्या दोन तास उशिराने देण्यात आल्या. दुपारी १ ते ३ असा वेळ देऊन पेपर सोडविण्यात आले. परीक्षा मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थांना अडीच तास ताटकळत बसावे लागले.
दरम्यान, बोर्डाच्या गलथान कारभाराचा निषेध श्रमजीवी संघटनेचे सहसरचिटणीस विजय जाधव, विजय गायकवाड, अशोक जाधव, रोहन जाधव, भालचंद्र कासार यांनी केला. विद्यार्थांना शाळेकडून बिस्किटे व पाणी देण्यात आले. परीक्षा बोर्डाचे विभागीय सचिव चांदेकर यांच्याशी दूरध्वनी करून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर आम्ही वेळेपूर्वी प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडू शकत नाही. त्यामुळे ही चूक आधी लक्षात आली नाही. अशी माहिती कस्टोडीयन विलास शिंदे यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Chinchaghar question papers are 2 hours late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.