नगराध्यक्षाच्या निवडीचा घोळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:50 AM2020-02-14T00:50:56+5:302020-02-14T00:51:01+5:30

शासन निर्णयाचे काय? : निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतेही आदेश नाहीत

The choice of city president remains intact | नगराध्यक्षाच्या निवडीचा घोळ कायम

नगराध्यक्षाच्या निवडीचा घोळ कायम

Next

पंकज पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ/ बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी एक सदस्य पद्धतीने निवडणूक होणार, हे निश्चित झाले असले तरी अजूनही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत संभ्रम कायम आहे. याबाबत निवडणूक आयोगाचा कोणताही आदेश अद्याप आलेला नाही. राज्य शासनाने कॅबिनेटच्या बैठकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक नागरिकांमधून न घेता नगरसेवकांमधून घेण्याचे निश्चित केले असले, तरी ते आदेश निवडणूक आयोगामार्फत पालिकेला मिळालेले नाहीत. त्यामुळे नगराध्यक्षांची निवडणूक जनतेतून होणार की नगरसेवकांमधून, याबाबत संभ्रम कायम आहे.


राज्य शासनाने नगर परिषदेमधील नगरसेवकांची निवडणूक ही एक सदस्य पद्धतीने घेण्याबाबत निर्णय घेतला आणि तो निर्णय निवडणूक आयोगाने मान्यदेखील केला. २७ जानेवारीला हा आदेश काढण्यात आल्यानंतर त्यानुसार निवडणूक आयोगाने नवीन आदेश काढून आरक्षण सोडतही निश्चित केली.
त्यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही नगर परिषदांची निवडणूक ही एक सदस्य पद्धतीने होणार हे निश्चित झाले आहे. मात्र, नगराध्यक्षपदाची निवडणूक ही जनतेतून होणार की नगरसेवकांमधून, याबाबत कोणताही स्पष्ट आदेश निवडणूक आयोगामार्फत अद्याप आलेला नाही.


राज्य शासनाने कॅबिनेटच्या बैठकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेत नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो निर्णय निवडणूक आयोगाने स्वीकारणे आणि त्यांच्यामार्फत नगर परिषदेला निर्देश जाणे, हे अद्याप निश्चित केलेले नाही.
शासनाचा नवीन आदेश निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेत आहे. त्यासंदर्भात योग्य वेळी निर्णय न घेतल्यास नगराध्यक्षपदाची निवडणूक ही जनतेतून होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने नगरसेवकांमधून निवड करण्याचा निर्णय घेतला असला, तरी तो निर्णय निवडणूक आयोगाने मान्य करून आगामी निवडणुकीसाठी त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. योग्यवेळी निर्णय झाला नाही तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा घोळ वाढण्याची शक्यता आहे.


च्नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेतून घेण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता. त्यात बदल करून महाविकास आघाडीने नगराध्यक्षपदाची निवडणूक ही पुन्हा नगरसेवकांमधून करण्याचा निर्णय घेतला.
च्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडीच्या प्रक्रि येचा निर्णय कधी होणार, याची प्रतीक्षा आहे.
च्निवडणूक आयोगाने राज्य शासनाचा निर्णय मान्य न केल्यास अंबरनाथ आणि बदलापूरची निवडणूक ही थेट जनतेतून होण्याची शक्यता आहे.

च्आयोगाने वेळेत राज्य शासनाचे निर्णय स्वीकारल्यास नगराध्यक्षाची निवड ही नगरसेवकांमधून होईल.
च्मात्र, निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांमध्ये अद्यापही संभ्रम कायम असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज आहे.

Web Title: The choice of city president remains intact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.