स्मारक लोकार्पणमध्ये चोेरट्यांची चांदी
By admin | Published: January 9, 2017 07:34 AM2017-01-09T07:34:01+5:302017-01-09T07:34:01+5:30
काळातलाव येथे उभारण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा शनिवारी सायंकाळी झाला.
कल्याण : काळातलाव येथे उभारण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा शनिवारी सायंकाळी झाला. या सोहळ्यास शिवसैनिकांची गर्दी ओसंडून वाहत होती. या गर्दीत चोरट्यांनी त्यांचा हात साफ करून घेतला. या गर्दीत अनेकांची पाकिटे मारण्यात आली. तसेच मोबाइल चोरीच्या घटना समोर आल्या.
युवासेनेचे कल्याण शहराध्यक्ष अभिषेक मोरे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोकार्पण सोहळ्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. सोहळ्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत हात मारला. स्मारकाचे वास्तुशिल्पकार संजय सुरे यांचा महागडा मोबाइल, युवासेनेचे अध्यक्ष मोरे यांचा मोबाइल, पालिकेचे अधिकारी विलास कोलते यांचे पॉकेट, तर सेनेच्या बड्या पदाधिकाऱ्यांसह अनेकांची पाकिटे चोरीला गेली. (प्रतिनिधी)