जीर्ण विजेच्या खांबामुळे धोका
By admin | Published: April 28, 2017 12:16 AM2017-04-28T00:16:47+5:302017-04-28T00:16:47+5:30
तळवली गावामध्ये नारायण पाटील, संजय मालकर, संदीप मालकर यांच्या घरासमोरील असलेल्या विजेच्या खांबाची दुरवस्था
मोहोपाडा : तळवली गावामध्ये नारायण पाटील, संजय मालकर, संदीप मालकर यांच्या घरासमोरील असलेल्या विजेच्या खांबाची दुरवस्था झाल्यामुळे येथील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा विजेचा खांब खालच्या बाजूनी पूर्णपणे गंजून गेला असून तो पडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे येथे हा खांब पडून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा विजेचा खांब बदलावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तालुक्यातील गावामध्ये विजेचे खांब, विद्युत डीपीला दरवाजे सुद्धा नाही. मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. वीज बिल जर सक्तीने वसुली करीत असेल तर ग्राहकांना सहकार्य करणे हे वीज मंडळाचे नैतिक कर्तव्य आहे. मात्र याकडे डोळेझाक करीत आहे. या ठिकाणी घरे तसेच लहान मुले खेळण्यासाठी येत असतात, अशा वेळी अपघातांची समस्या नाकारता येत नाही.
पावसाळा सुरू होण्यासाठी दिड महिन्याचा कालावधी असल्यामुळे या विजेच्या खांबाचा शॉक लागण्याची शक्यता असते. अशावेळी वीज मंडळ अधिकारी यांनी लक्ष घालून या ठिकाणी नवीन खांब बसवावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत. (वार्ताहर)