सिगारेट विक्री: पोलीस कारवाईच्या भीतीने पळाल्याने ठाण्यात विक्रेत्याने गमावला पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 10:04 PM2020-10-14T22:04:51+5:302020-10-14T22:12:05+5:30
रस्त्यावर सिगारेट विक्र ी करणाऱ्या आशिष चांद पठाण (२४) याने पोलीस कारवाईच्या भीतीने पळ काढला. त्यातच समोरुन आलेल्या ट्रकने त्याला धडक दिल्याची घटना घोडबंदर रोडवर घडली. या अपघातात त्याचा पाय जायबंदी झाला आहे. मात्र,पोलीस कर्मचाºयाने पाच हजारांची लाच मागून त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप त्याच्या कुटूंबीयांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रस्त्यावर सिगारेट विक्र ी करणा-या आशिष चांद पठाण (२४) याने पोलीस कारवाईच्या भीतीने पळ काढला. त्यातच समोरुन आलेल्या ट्रकने त्याला धडक दिल्याची घटना घोडबंदर रोडवर घडली. या अपघातात त्याचा पाय निकामी झाला असून याप्रकरणी ट्रक चालक अब्दुल सत्तार मकानदार (४०, रा. कारवार, कर्नाटक) याला कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. दरम्यान, चहा सिगारेटची विक्री करणाºया आशिषकडे पोलीस कर्मचा-याने पाच हजारांची लाच मागून त्याला बेदम मारहाण करीत गाडी खाली ढकलून दिल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे पठाण कुटूंबियांनी केली आहे.
कासारवडवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साईनगर येथील रहिवाशी आशिष चांद पठाण हा हायपर सिटी मॉलसमोर सिगारेट आणि गुटखा विक्री करतो. १३ आॅक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास कासारवडवली पोलीस आपल्यावर कारवाई करतील, या भीतीने तो पोलिसांना पाहून पळत सुटला. त्याच वेळी घोडबंदर रोडने जाणाºया एका भरघाव ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत आशिषच्या पायावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा डावा पाय यात निकामी झाला. गंभीर जखमी झालेल्या आशिषला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ट्रक चालक अब्दूल हामीद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. * दरम्यान, या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या आशिषच्या वडिलांनी मात्र कासारवडवली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या अपंग मुलाकडून पोलीस हवालदार भदाणे यांच्यासह दोघे पोलीस पाच हजारांचा हाप्ता मागत होते. तो न दिल्यामुळे पोलिसांनी त्याला जबर मारहाण करीत गाडीच्या खाली फेकून दिले. या घटनेमध्ये त्याला आपला डावा पाय कायमस्वरूपी गमवावा लागला आहे. त्यामुळे संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.