ठाण्यात उद्यापासून सुरु होणार सिरो सर्व्हे; उपायुक्त मनीष जोशी यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 07:15 PM2021-10-11T19:15:42+5:302021-10-11T19:15:48+5:30
ठाणे महापालिका हद्दीत आतार्पयत १ लाख ३९ हजार ८६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
ठाणे: कोरोनाची दुसरी लाट जवळ जवळ ओसरत आली आहे. त्यानुसार आता तिस:या लाटेसाठी ठाणो महापालिका सज्ज होत आहे. अशातच आता ठाणे महापालिकेच्या वतीने आजपासून सिरो सर्व्हेला सुरवात केली आहे. नऊ प्रभाग समिती अंतर्गत प्रत्येक आरोग्य केंद्रात हा सर्व्हे केला जाणार असून लोकसंख्येच्या अनुषंगाने विविध गटातील जवळ जवळ १५०० नागरीकांचा हा सर्व्हे केला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
ठाणे महापालिका हद्दीत आतार्पयत १ लाख ३९ हजार ८६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील २०९१ जणांचा आतार्पयत मृत्यु झाला आहे. तर जवळ जवळ १ लाख ३६ हजाराहून अधिक नागरीकांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतार्पयत महापालिका हद्दीत १४ लाख नागरीकांचे लसीकरण झाले आहे. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट जवळ जवळ ओसरत आली आहे. महापालिका हद्दीत रोज ६० ते ७० कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. परंतु ठाणे शहराची लोकसंख्या ही २४ लाखांच्या घरात आहे. त्यातील किती लोकांना कोरोना होऊन गेला, किती नागरीकांमध्ये अॅन्टीबॉडीज तयार झालेल्या आहेत. हे पाहण्यासाठी किंबहुना ठाणे कोरोनामुक्तीच्या दिशेने जात आहे का? कोणत्या प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक नागरीकांमध्ये अॅन्टीबॉडीज तयार झालेल्या आहेत. त्यानुसार कशा प्रकारच्या उपाय योजना करणो अपेक्षित आहे. यासाठी आता सिरो सव्र्हे करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे.
मंगळवारी महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत कोपरी येथील आरोग्य केंद्रावर याचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यानंतर नऊ प्रभाग समिती अंतर्गत प्रत्येक आरोग्य केंद्रावर असा सव्र्हे केला जाणार आहे. यासाठी विविध वयोगटातील नागरीकांचा समावेश असणार आहे. यासाठी खाजगी रुग्णालयांची देखील मदत घेतली जाणार आहे. त्यानुसार नऊ प्रभाग समिती मधील १५०० नागरीकांचा सव्र्हे केला जाणार असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.