रिक्षातील प्रवाशाच्या मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्यास नागरिकांनी रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 06:36 PM2020-12-21T18:36:51+5:302020-12-21T18:40:03+5:30
रिक्षातील प्रवाशाच्या मोबाईलची मोटारसायकलवरुन येऊन जबरीने चोरी करुन पळणाºया महंमद शेख (२५, रा. मुंब्रा) याला नागरिकांच्या मदतीने नौपाडा पोलिसांनी सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्याला २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रिक्षातील प्रवाशाच्या मोबाईलची मोटारसायकलवरुन येऊन जबरीने चोरी करुन पळणाºया महंमद शेख (२५, रा. मुंब्रा) याला नागरिकांच्या मदतीने नौपाडा पोलिसांनी सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून मोटारसायकलसह ६५ हजारांचे चार मोबाईल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नवी मुंबईतील घणसोली येथील रहिवाशी सर्वेश सकपाळ हे त्यांचे मित्र श्रीधर शेवाळे यांच्यासह ठाण्यातील नितीन कंपनी येथून ठाणे रेल्वे स्थानक येथे २० डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रिक्षाने जात होते. ते ठाणे महापालिका सर्कलजवळ आले असता, त्यांच्या पाठीमागून एका मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने त्यांच्या हातातील १५ हजारांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता. हा आरडाओरडा ऐकून काही नागरिकांनी पाठलाग करुन त्यांच्यापैकी मोटारसायकल चालविणाºया महंमद शेख याला पकडले. नंतर त्याठिकाणी आलेल्या पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने त्याला मोटारसायकलसह ताब्यात घेतले. या धुमश्चक्रीत त्याचा दुसरा साथीदार मात्र पसार झाला. त्याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याला २१ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अश्विनी राऊत यांनी अटक केली. सखोल चौकशीत त्याने मुलूंड आणि कळवा भागातून चोरलेले अन्य तीन मोबाईलसह ६५ हजारांचे चार मोबाईल हस्तगत केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. त्याला २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.