ठाण्यातील कोपरी आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी तोबा गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 11:58 AM2021-07-12T11:58:53+5:302021-07-12T11:59:15+5:30
ठाणे : लसीकरणाच्या तुटवड्यामुळे ठाण्यात गेले दोन ते तीन दिवस लसीकरण बंद होते. त्यानंतर आज ठाण्यात लसीकरनाला सुरूवात झाली ...
ठाणे: लसीकरणाच्या तुटवड्यामुळे ठाण्यात गेले दोन ते तीन दिवस लसीकरण बंद होते. त्यानंतर आज ठाण्यात लसीकरनाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे ठाण्यातील कोपरी आरोग्य केंद्रावर नागरिकांनी तोबा गर्दी केली आहे. पहाटे चार वाजल्यापासून ज्येष्ठ नागरीकदेखील लस मिळवण्यासाठी रांगेत उभे आहेत.
लसीकरण केंद्राबाहेर कोणतीही सोय नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. लसीचे किती डोस आहेत लसीकरणाबद्दल कोणतीही माहिती आरोग्य केंद्र देत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे कोपरी लसीकरण केंद्राबाहेर चांगलाच गोंधळ दिसून आला. लसीकरणाच्या आणीबाणीत ठाणेकरांना किती त्रास सहन करावा लागेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.