धोकादायक इमारतीतील नागरिकांना मिळणार हक्काचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:49 AM2021-09-08T04:49:00+5:302021-09-08T04:49:00+5:30

उल्हासनगर : व्हीटीसी मैदानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडासंकुलाचे भूमिपूजन तर जलशुद्धीकरण केंद्र, अत्याधुनिक बोटी व भुयारी गटार साफ करणारा ...

Citizens in dangerous buildings will get their rightful home | धोकादायक इमारतीतील नागरिकांना मिळणार हक्काचे घर

धोकादायक इमारतीतील नागरिकांना मिळणार हक्काचे घर

Next

उल्हासनगर : व्हीटीसी मैदानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडासंकुलाचे भूमिपूजन तर जलशुद्धीकरण केंद्र, अत्याधुनिक बोटी व भुयारी गटार साफ करणारा राेबाेट या सुविधांचा ऑनलाइन लोकार्पण सोहळा पालकमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी पार पडला. ठाणेच्या धर्तीवर उल्हासनगरचा विकास करणार असून धोकादायक इमारतीमधील नागरिकांना हक्काचे घर मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

उल्हासनगरातील व्हीटीसी मैदानात २५ कोटींच्या निधीतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने क्रीडा संकुल उभे राहणार आहे. क्रीडासंकुलाचे भूमिपूजन पालकमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच वडोलगाव व शांतीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्र, महापालिका अग्निशमन दलात दाखल झालेल्या अत्याधुनिक बोटी व भुयारी गटार साफ करण्यासाठी राेबाेटचा उपयोग करण्यात येणार आहे. शहरात विकासकामाला गती आली आहे. विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. धोकादायक इमारतीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अध्यादेशान्वये दंड कमी करण्याची हमीही दिली. कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, कुमार आयलानी, महापौर लीलाबाई अशान, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रोहित साळवे, राष्ट्रवादीचे गटनेते भारत गंगोत्री, साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, गटनेते गजानन शेळके, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक धनंजय बोडारे, अरुण अशान आदी उपस्थित होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भव्य क्रीडासंकुल उभे राहणार आहे. या संकुलाला निधी कमी पडू देणार नाही. भविष्यात येथून राष्ट्रीय स्तरावर खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काेविड काळातील पालिकेच्या कामाचे काैतुक

महापालिकेने कोणतीही स्वतःची यंत्रणा नसताना कोविड काळात उत्तम काम केल्याची काैतुकाची थापही त्यांनी महापौर लीलाबाई अशान, आयुक्त डॉ. राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांना दिली.

Web Title: Citizens in dangerous buildings will get their rightful home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.