मुंब्र्यातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:38 AM2021-04-13T04:38:51+5:302021-04-13T04:38:51+5:30
मुंब्रा : दोन दिवसांच्या वीकेंड लाॅकडाऊननंतर सोमवारी मुंब्र्यातील विविध भागातील बाजारपेठांमध्ये बहुतांशी ठिकाणी भरउन्हातही वाणसामान, भाजीपाला तसेच फाळेखरेदी ...
मुंब्रा : दोन दिवसांच्या वीकेंड लाॅकडाऊननंतर सोमवारी मुंब्र्यातील विविध भागातील बाजारपेठांमध्ये बहुतांशी ठिकाणी भरउन्हातही वाणसामान, भाजीपाला तसेच फाळेखरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. यामुळे येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. खरेदीसाठी झालेल्या या गर्दीकडे बघून स्थानिक जागरुक नागरिक आश्चर्य व्यक्त करत होते.
गेल्या सोमवारपासून राज्यात सुरू असलेल्या कडक लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता दुकानांवर निर्बंध घातले आहेत. मात्र सोमवारी सर्वांनीच दुकाने उघडली होती. हे लक्षात येताच पोलीस प्रशासनाने अत्यावश्यक सेवेत समावेश नसलेल्या व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने बंद करण्याचे निर्देश दिले. यामुळे त्या व्यापाऱ्यांची दुकाने बंद करण्यासाठी तारांबळ उडाली होती. अत्यावश्यक सेवेत समावेश नसतानाही दुकाने उघडलेल्या दुकानचालकांना अवघ्या दीड ते दोन तासात दुकानांचे शटर डाऊन करावे लागले.