भिवंडी महानगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे गोपाळ नगर परिसरातील नागरिक हैराण, आमदार रईस शेख यांची घेतली भेट
By नितीन पंडित | Published: July 22, 2023 08:48 PM2023-07-22T20:48:54+5:302023-07-22T20:50:52+5:30
येथील रहिवासी संकुलनातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेक वेळा विनंती अर्ज करूनही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर गोपाळ नगर रहिवासी संकुलनातील नागरिकांनी आमदार रईस शेख यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन शेख यांना दिले.
भिवंडी : भिवंडी मनपा मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गोपाळ नगर परिसरात अंतर्गत गटारे जमिनीदोस्त झाली असल्याने गटारातील पाणी रहिवासी संकुलनांमध्ये शिरत असल्याने येथील नागरिकांना दुर्गंधी व दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. येथील रहिवासी संकुलनातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेक वेळा विनंती अर्ज करूनही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर गोपाळ नगर रहिवासी संकुलनातील नागरिकांनी आमदार रईस शेख यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन शेख यांना दिले.
गोपाळ नगर परिसरात महापालिकेने सुशोभीकरण केले असून हे सुशोभीकरण करताना मनपाने अंतर्गत गटार व नाल्यांबाबत कोणतेही नियोजन केले नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असून बाजूला असलेल्या रहिवासी संकुलांबरोबरच दांडेकर विद्यालयात देखील हे पाणी भारत असते त्यामुळे सौचालय व गटारांचे पाणी देखील बाहेर येत असल्याने या भागात प्रचंड दुर्गंधी येत असते तसेच नागरिकांना होणार पाणी पुरवठा देखील दूषित होत असल्याने नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले असून या भागात असलेल्या मनपाच्या नाल्यावर कोणतेही संरक्षण नसल्याने या नाल्यात पडून दुर्घटना होण्याची शक्यता देखील गोपाळ नगर रहिवासी संकुलनातील रहिवाश्यांनी आमदार शेख यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.
आमच्या मागणीकडे महापालिका आतापर्यंत दुर्लक्ष करत असल्याने अखेर शनिवारी आम्ही आमदार रईस शेख यांची भेट घेतली असून सदर विषय लवकरात लवकर मार्गी काढण्यात येणार असून घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे आश्वासन देखील आमदार शेख यांनी आम्हाला दिले असल्याची माहिती गोपाळ नगर रहिवाशांनी दिली आहे.