नागरिकांच्या समस्यांचा जागीच निवाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:45 AM2017-07-26T00:45:35+5:302017-07-26T00:45:42+5:30

शहरविकास तसेच नागरिक व नगरसेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयुक्तांनी ‘आॅन दि स्पॉट’ उपक्रम सोमवारी सुरू केला. पालिका विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत नगरसेवक व नागरिक आपल्या समस्या मांडत असून त्या सोडवण्याचा धडाका आायुक्तांनी लावला आहे

Citizens Problems Solve On the spot | नागरिकांच्या समस्यांचा जागीच निवाडा

नागरिकांच्या समस्यांचा जागीच निवाडा

Next

उल्हासनगर : शहरविकास तसेच नागरिक व नगरसेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयुक्तांनी ‘आॅन दि स्पॉट’ उपक्रम सोमवारी सुरू केला. पालिका विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत नगरसेवक व नागरिक आपल्या समस्या मांडत असून त्या सोडवण्याचा धडाका आायुक्तांनी लावला आहे. त्यापैकी ५० टक्के तक्रारी बेकायदा बांधकामाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
उल्हासनगर महापालिकेला शिस्त आणण्यासाठी आयुक्तांनी विविध उपक्रम सुरू केले. नगरसेवक उठसूठ केव्हाही आयुक्तांना भेटत असल्याने, त्याचा पालिका कामकाजावर परिणाम झाला. अखेर आयुक्तांनी नागरिक व नगरसेवकांनी फक्त सोमवारी भेटा, असे फर्मान काढले. याला सुरूवातीला विरोध झाला. मात्र नगरसेवकांनी नंतर सहकार्य करण्याचे ठरवले आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजता पालिका आयुक्त सर्व विभागप्रमुख अधिकाºयांची बैठक घेऊन पालिका कामकाजाची माहिती घेतात. त्यानंतर नागरिक व नगरसेवकांना बोलावून त्यांच्या समस्या ऐकून घेतात. त्यानंतर संबंधित अधिकाºयांना बोलवून केव्हा सोडवणार याबाबत विचारणा करून आॅन दि स्पॉट निर्णय घेतला.
आयुक्तांचा हा उपक्रम चर्चेचा विषय झाला असून नगरसेवकांसह पालिका अधिकारी यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. नगरसेवक, नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकारी हे, आयुक्तांसमोर आश्वासन देतात. मात्र प्रत्यक्षात आठवडयानंतर ती सोडवली जात नसल्याचे उघड झाले आहे. मात्र या उपक्रमासाठी संपूर्ण दिवस नागरिक, नगरसेवक, अधिकारी यांचा फुकट जातो. समस्या वेळेत सुटल्या नसल्यान त्याची यादीच दिवसेंदिवस मोठी होत असल्याचा आरोप-प्रत्यारोप होत आहे.
सोमवारच्या आयुक्तांच्या आॅन दि स्पॉट कार्यक्रमात नगरसेवकांसह नागरिकांच्या ५० टक्के तक्रारी बेकायदा बांधकामाबाबत आहे. यापुढे उपायुक्त संतोष दहेरकर हे बेकायदा बांधकामाच्या सुनावणी ऐकून घेऊन निर्णय घेतील, असे आयुक्यांनी सांगितले. त्यामुळे यापुढे निर्णय घेतले जाणार का याकडे लक्ष लागले आहे.

बेकायदा बांधकामे सुरूच
आयुक्त राजेंद्र निंबाळकर, उपायुक्त संतोष दहेरकर, प्रभाग अधिकारी, बीट निरीक्षक, मुकादम यांच्या नाकावर टिच्चून बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. महिन्याभरा पासून पाडकाम कारवाई नाही.

Web Title: Citizens Problems Solve On the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.