एक दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:45 AM2021-08-25T04:45:23+5:302021-08-25T04:45:23+5:30
अंबरनाथ पश्चिम भागातील नालंदानगर, कृष्णानगर, पाटील कॉलनी, नवरे पार्क, दोस्ती कॉलनी, रसाळ नगरी, कोहजगाव, कमलाकर नगर आणि वांद्रापाडा भागात ...
अंबरनाथ पश्चिम भागातील नालंदानगर, कृष्णानगर, पाटील कॉलनी, नवरे पार्क, दोस्ती कॉलनी, रसाळ नगरी, कोहजगाव, कमलाकर नगर आणि वांद्रापाडा भागात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. जीवन प्राधिकरणातर्फे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र त्यातही एखाद्या दिवशी पाणीपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा होत नाही. या अनियमित पाणीपुरवठ्याविरोधात काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील आणि चरण रसाळ यांनी कार्यकर्त्यांसह जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मुळात अंबरनाथ शहराला नियमित पाणीपुरवठा होणे अपेक्षित असताना जीवन प्राधिकरण एक दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहे. प्राधिकरणाने संपूर्ण शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा याची सवय लावून ठेवली आहे. या एक दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यातही अनेक वेळा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्याविना राहण्याची वेळ येत आहे.
आंदाेलनाचा इशारा
अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, केवळ एक तास पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना दोन दिवस पुरेल एवढे पाणी भरणे शक्य होत नाही, अशा परिस्थितीत जीवन प्राधिकरणाने पुन्हा प्रत्येक दिवशी पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच एमआयडीसीकडून वाढीव पाणीपुरवठा मिळत नसल्याने एमआयडीसीच्या विरोधातही आंदोलन करण्याचा इशारा प्रदीप पाटील यांनी दिला आहे.
-------------
फोटो आहे.