शहर विकास आराखड्याची पोलखोल, उल्हासनगरात चक्क शाळा प्रांगण व झोपडपट्टीवर कब्रस्तान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 07:35 PM2017-12-06T19:35:52+5:302017-12-06T19:36:06+5:30

उल्हासनगर : आरक्षित भूखंडाऐवजी चक्क शाळा मैदान व झोपडपट्टीवर कब्रस्तान दाखविण्यात आले. बिल्डर, धनदांडगे व अधिकारी यांच्या हातचलाखीची ही जादू असल्याची खिल्ली, विरोधी पक्षांनी उडवून शाळेच्या शिक्षकासह विद्यार्थी, पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 City Development Planet Polkhol, Ulhasnagar, High School premises and slum graveyard | शहर विकास आराखड्याची पोलखोल, उल्हासनगरात चक्क शाळा प्रांगण व झोपडपट्टीवर कब्रस्तान

शहर विकास आराखड्याची पोलखोल, उल्हासनगरात चक्क शाळा प्रांगण व झोपडपट्टीवर कब्रस्तान

Next

- सदानंद नाईक
उल्हासनगर : आरक्षित भूखंडाऐवजी चक्क शाळा मैदान व झोपडपट्टीवर कब्रस्तान दाखविण्यात आले. बिल्डर, धनदांडगे व अधिकारी यांच्या हातचलाखीची ही जादू असल्याची खिल्ली विरोधी पक्षांनी उडवून शाळेच्या शिक्षकासह विद्यार्थी, पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उल्हासनगरचा तब्बल ४३ वर्षानंतर शहर विकास आराखडा मंजूर झाला. सुरुवातीला नवीन विकास आराखड्यामुळे शहर विकास साधले जाणार, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती. मात्र एका आठवड्यात विकास आराखड्याची पोलखोल सुरू झाली. बिल्डर व धनदांडगा धार्जिणा विकास आराखडा मंजूर झाल्याची टीका शिवसेनेसह रिपाइं, कॉग्रेस, राष्टवादी, भारिप, पीआरपी, साई पक्षाने केली. महापालिका महासभेने मंजूर केलेल्या विकास आराखड्यात, नागरिकांच्या हरकती व सूचनेचा विचार केला नसल्यानेच अशा चुका झाल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

शासनाकडे पाठविलेल्या विकास आराखड्यात म्हारळ गाव शेजारील आरक्षित भूखंड व कॅम्प नं-५ येथील भूखंडावर नियोजित कब्रस्तान दाखविण्यात आले होते. मात्र मंजूर झालेल्या शहर विकास आराखड्यात चक्क शाळा प्रांगण व झोपडपट्टीवर कब्रस्तान दाखविल्याने शाळा व झोपडपट्टीधारकात खळबळ उडाली. नवीन शहर विकास आराखड्याची पोलखोल विशेष महासभेत बाहेर काढणार असून, विकास आराखडा रद्द करण्याची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षांनी दिली. विकास आराखड्यात कॅम्प नं-३ सम्राट अशोकनगर येथील आरक्षण क्र-१५५ मध्ये कब्रस्तान दाखविण्यात आले आहे. मातोश्री रमाबाई आंबेडकर मराठी शाळेचे मैदान व शेजारील झोपडपट्टी आरक्षण क्र-१५५ मध्ये येते. असी प्रतिक्रीया महापालिका नगररचनाकार विभागातील अभियंता कुमार जग्यासी यांनी दिली.

Web Title:  City Development Planet Polkhol, Ulhasnagar, High School premises and slum graveyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.