विकासासाठी नागरिक-प्रशासन-सत्ताधारी एकवटावेत

By admin | Published: November 14, 2015 11:42 PM2015-11-14T23:42:27+5:302015-11-14T23:42:27+5:30

शिवसेना पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षातील सर्वांच्या सहकार्याने महापौरपद मिळाले. आता ते सार्थ ठरवणे, ही मोठी जबाबदारी आहे.

Civic-governance-unitholders for development | विकासासाठी नागरिक-प्रशासन-सत्ताधारी एकवटावेत

विकासासाठी नागरिक-प्रशासन-सत्ताधारी एकवटावेत

Next

* महापौरपद तर मिळाले, आता पुढील अजेंडा काय ?
शिवसेना पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षातील सर्वांच्या सहकार्याने महापौरपद मिळाले. आता ते सार्थ ठरवणे, ही मोठी जबाबदारी आहे. सर्वात आधी स्वच्छतेवर भर देण्याचा मानस आहे. धूळ आणि कचरामुक्त शहर करणे, हे आवश्यक आहे. कचऱ्याच्या समस्येमुळे न्यायालयाने महापालिकेला फटकारले आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्याला प्राधान्य असेल. त्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहेच. आयएएस आयुक्त आहेतच. खरे तर, हीच काय पण या महानगरांमधील कोणतीही समस्या सोडवायची असेल तर नागरिक-प्रशासन-लोकप्रतिनिधी या त्रिसूत्रीच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. या घटकांची सांगड घालणे, हे माझे (पदाचे) कार्य मी मानतो. त्यामुळे एकच अजेंडा नाही तर प्राधान्यक्रम ठरवून कचरा, रस्ते (काँक्रिटीकरण-डांबरीकरण), धूळ-प्रदूषणमुक्त शहरे करणे, पाणीसमस्या सोडवणे, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, भाजी मंडई, मच्छी मार्केट यासह मोकळे पदपथ आदींसह वाहतूक, सुरक्षा हेदेखील प्रश्न मार्गी लावावे लागणार आहेत.
* आॅक्टोबर-नोव्हेंबरपासूनच पाणीसमस्या भेडसावतेय, त्याचे काय? यंदा पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे सर्वत्र ही समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी नागरिकांनीही जपून पाणी वापरावे. प्रशासनानेही पाणीगळती रोखण्यावर भर द्यावा. तसेच लोकप्रतिनिधींनीही पाणीचोरी होणार नाही, यासाठी प्रभागात लक्ष द्यावे. सर्वांनाच पाणी वाचवा... हे आवाहन आहे.
* रखडलेल्या प्रकल्पांचे काय? जे प्रकल्प रखडले आहेत, ते पूर्ण करावेच लागतील. त्यात बीएसयूपी, गोविंदवाडी बायपास, डोंबिवली-ठाकुर्ली आरओबी, कचऱ्याचा प्रकल्प, नव्या बांधकामांना परवानगी संदर्भातील प्रश्न, ठिकठिकाणचे काँक्रिटीकरण-डांबरीकरण आदी निश्चितच केले जाईल. त्याची पूर्तता झाल्यावर नव्या प्रस्तावांचा विचार करू. * ६ हजार ५०० कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय?
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे, म्हणजे ते मिळतीलच. त्यासाठी महापौर-उपमहापौर यासह विविध समित्या गठीत झाल्यावर सर्वांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाणार. त्या पॅकेजमधील अधिकाधिक निधी लवकरात लवकर मिळवून विकासकामांचा शुभारंभ करणे, वेळेत त्यांची पूर्तता करण्यावर भर देणार. २७ गावांमध्ये पायाभूत सुविधा देण्यासह नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठीही प्रयत्न केले जातील. * प्रदूषण समस्येवर काय उपाययोजना करणार ?
केंद्रासह राज्य शासन डोंबिवलीतील प्रदूषणासंदर्भात गांभीर्याने विचार करत आहे. त्यामुळे त्यांना आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत केली जाईल. तसेच कल्याणातील वालधुनी प्रदूषण सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार. प्रदूषण नियंत्रण मंडळासह संबंधित मंत्र्यांकडे यासंदर्भात पाठपुरावा सुरू करणार. * केडीएमटीचा दर्जा सुधारणे, रिक्षाचालकांची मनमानी कशी रोखणार ?
नागरिकांच्या दृष्टीने रिक्षा पर्यायीच नव्हे तर ती आवश्यक सुविधा आहे. पण, मनमानी करणाऱ्यांवर निश्चितच चाप लावणार. महापालिका परिवहन सेवेबाबत अंतर्गत रस्त्यांवर ती धावणे यासह जास्तीतजास्त लोकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न
करणार.
* आरोग्यासह सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली आहे, त्याचे काय? बरोबर आहे, त्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जी रिक्त पदे आहेत ती भरणे, ती प्रक्रिया होत नाही तोपर्यंत खाजगी तत्त्वावर ती सेवा तत्काळ पुरवणे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षेसंदर्भात पोलीस यंत्रणेला महापालिकेकडून जे सहकार्य हवे
आहे, ते निश्चितच मिळेल, पण ती सर्वतोपरी जबाबदारी गृहखात्याची आहे.

Web Title: Civic-governance-unitholders for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.