नागरिक हैराण, सर्वत्र दुर्गंधी; उल्हासनगरात उघड्या डंपरमधून कचऱ्याची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 07:16 PM2022-02-12T19:16:56+5:302022-02-12T19:17:11+5:30
तसेच कचरा कुंड्या भोवती जंतुनाशक औषधांची फवारणी करणे, कचरा उचळनाऱ्या कर्मचाऱ्यांना गमबूट, हातमोजे देण्याची अट ठेका करारनाम्यात आहे
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील कचरा बंद गाडीतून वाहून नेण्याची अट असतांना उघड्या डंपर मधून वाहतूक केली जात आहे. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून उघड्या डंपरमधून कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगरातील कचरा उचलण्याचा ठेका महापालिकेला खाजगी कंपनीला देण्यात आला असून दररोज कचरा उचलण्यावर साडे चार लाखा पेक्षा जास्त खर्च केला जातो. तसेच अटी व शर्तीनुसार कचरा बंद गाडीतून नेने बंधनकारक असतांना उघड्या डंपर मधून कचरा नेला जात असल्याचे चित्र शहरात आहे.
तसेच कचरा कुंड्या भोवती जंतुनाशक औषधांची फवारणी करणे, कचरा उचळनाऱ्या कर्मचाऱ्यांना गमबूट, हातमोजे देण्याची अट ठेका करारनाम्यात आहे. मात्र सर्रासपणे अटी व शर्तीचे उल्लंघन होत असल्याची ओरड आहे. उघड्या डंपर मधून कचऱ्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाईची मागणी होत आहे. याबाबत मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.